शेअर मार्केटमध्ये हाहाकार! Investers च्या डोळ्यात पाणी, काही मिनिटांत बुडाले 6.64 लाख कोटी

Last Updated:

फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी रुपये बुडाले. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 6.64 लाख कोटी रुपयांनी घटले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेचा बाजारावर दबाव.

News18
News18
मुंबई: गुंतवणूकदारांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणलं आहे. काय करावं डोकं चालेना अशी स्थिती झाली आहे. फेब्रुवारी महिन्याने जगभरातील गुंतवणूकदारांना मोठा फटका दिला आणि शेवटच्या दिवशीही काहीही दिलासा मिळाला नाही. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे झाले तर, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी रुपये बुडाले. कोणत्याही सेक्टरचा निफ्टी इंडेक्स ग्रीन झोनमध्ये दिसला नाही. ऑटो आणि आयटी सेक्टरवर सर्वाधिक दबाव असून त्यांचे निफ्टी इंडेक्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
मनी कंट्रोने दिलेल्या वृत्तानुसार सेंसेक्सवर फक्त दोन शेअर्सना किंचित वाढ झाली आहे. एकूणच पाहता, BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 6.64 लाख कोटी रुपयांनी घटले आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती 6.64 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. सध्या BSE Sensex 843.27 अंकांनी म्हणजेच 1.13% टक्क्यांनी घसरून 73769.16 वर आहे आणि Nifty 50 देखील 255.75 अंकांनी म्हणजेच 1.13% टक्क्यांनी घसरून 22289.30 वर आहे.
advertisement
bse
बाजारावर हा दबाव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठरवलेल्या टॅरिफ लागू होण्याच्या घोषणेने आला आहे, जी 4 मार्च आणि 2 एप्रिलपासून लागू होणार आहे. एका दिवस आधी म्हणजेच 27 फेब्रुवारी 2025 रोजी BSE वर लिस्टेड सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 3,93,10,210.53 कोटी रुपये होते. आज 28 फेब्रुवारी 2025 रोजी बाजार उघडल्यावर हे घटून 3,86,46,106.34 कोटी रुपये झाले. याचा अर्थ गुंतवणूकदारांची संपत्ती 6,64,104.19 कोटी रुपयांनी घटली आहे.
advertisement
मनी कंट्रोने दिलेल्या वृत्तानुसार सेंसेक्सवर फक्त एकच स्टॉक ग्रीन झोनमध्ये दिसत आहे, तो म्हणजे रिलायन्स आणि त्यामध्येही किरकोळ वाढ दिसत आहे. दुसरीकडे इंडसइंड बँक, M&M आणि टेक महिंद्रामध्ये मोठी घसरण झाली आहे. BSE वर आज 3263 शेअर्सची ट्रेडिंग होत आहे. त्यामध्ये 544 शेअर्स मजबूत आहेत, 2599 लाल रंगात आहेत आणि 120 शेअर्समध्ये कोणताही बदल नाही. त्याशिवाय 17 शेअर्स एक वर्षाच्या उच्च स्तरावर आहेत तर 590 शेअर्स एका वर्षाच्या निचल्या स्तरावर पोहोचले आहेत. 39 शेअर्स अपर सर्किटवर पोहोचले आणि 172 शेअर्स लोअर सर्किटवर आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
शेअर मार्केटमध्ये हाहाकार! Investers च्या डोळ्यात पाणी, काही मिनिटांत बुडाले 6.64 लाख कोटी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement