अस्थिर शेअर मार्केट तरी या शेअरने दिले दुप्पट रिटर्न, कोणत्या कंपनीचा आणि किती रिस्क?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतीय शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतानाही केआरएन हीट एक्स्चेंजर शेअरने चार महिन्यांत 100 टक्के वाढ दर्शवली आहे. कंपनीने आयपीओतून 342 कोटी रुपये कमावले आहेत.
भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान होत आहे. या चढ-उतारांना अनेक कारणं आहेत. अर्थात, या चढ-उतारांमध्येही काही शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळत आहे. त्यांपैकीच एक शेअर म्हणजे केआरएन हीट एक्स्चेंजर. गेल्या चार महिन्यांत शेअर बाजारात घसरण होत असूनही या शेअरने अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. त्याची किंमत अवघ्या चार महिन्यांत 100 टक्क्यांनी वाढली आहे. या शेअरबद्दल जाणून घेऊ या.
'लाइव्ह हिंदुस्तान'ने दिलेल्या वृत्तानुसार, केआरएन हीट एक्स्चेंजर या शेअरच्या किमतीत आज (10 फेब्रुवारी) 8 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. आज हा शेअर 861.20 रुपयांच्या आसपास होता; मात्र गेल्या चार महिन्यांत या शेअरची किंमत 100 टक्क्यांनी वाढली आहे. एवढंच नाही, तर याची किंमत 200 ते 210 रुपये या आयपीओ प्राइसपेक्षा जवळपास 400 टक्के वर आहे. या शेअरची 52 आठवड्यांतली उच्चांकी किंमत 1012 रुपये, तर नीचांकी किंमत 402.10 रुपये आहे.
advertisement
हीट एक्स्चेंजर म्हणजे काय?
ऑइल रिफायनरी, पॉवर प्लांट किंवा एअर कंडिशनिंग सिस्टीम यांपैकी काहीही असलं, तरी या यंत्रणा योग्य रीतीने सुरू राहण्यासाठी हीट एक्स्चेंजर्सची आवश्यकता असते. ही मशीन्स टेंपरेचर, मॉइश्चर आणि एअर क्लीनिंग या गोष्टींचं नियंत्रण करते, ओव्हरहीटिंग थांबवते आणि ऊर्जेची काळजी घेण्यात सुधारणा करते.
केआरएन हीट एक्स्चेंजर्स ही कंपनी एचव्हीएसी आणि आर इंडस्ट्रीज यांच्यासाठी फिनेड ट्यूब एक्स्चेंजर्सची एक मोठी उत्पादक कंपनी म्हणून काम करते. कमर्शियल अॅप्लिकेशन्स या विषयात या कंपनीची तज्ज्ञता आहे. प्लेट हीट एक्स्चेंजर बाजारातही काम सुरू असून, बाजाराची मागणी पूर्ण करण्यासाठी कंडेन्सर कॉइल, व्हेपरायझेशन युनिट, लिक्विड कॉइल यासह तांबं आणि अॅल्युमिनियम उत्पादनांची एक मोठी साखळी पुरवली जाते.
advertisement
या कंपनीचे एचव्हीएसी उद्योगात ओईएमशी दीर्घकालीन व्यावसायिक संबंध आहेत. त्यात डायकिन एअर कंडिशनिंग, श्नायडर इलेक्ट्रिक आणि ब्लू स्टार यांचा समावेश आहे. केआरएन ही कंपनी आपल्या पहिल्या 10 ग्राहकांवर सर्वाधिक अवलंबून आहे. कंपनीच्या महसुलातला 72.3 टक्के भाग या 10 ग्राहकांकडून मिळतो. तसंच, त्यांपैकी 33 टक्के महसूल फक्त डायकिन कंपनीकडून मिळतो, तर 10 टक्के महसूल श्नायडरकडून मिळतो.
advertisement
केआरएन कंपनीने आपल्या आयपीओसह उल्लेखनीय सुरुवात केली. कंपनीचा आयपीओ 213 पट ओव्हरसबस्क्राइब झाला. त्यामुळे कंपनीने मार्केटमधून 342 कोटी रुपये कमावले. त्यामुळे या कंपनीच्या शेअरचं लिस्टिंग 118 टक्के वर म्हणजेच प्रति शेअर 480 रुपये किमतीला झालं. आयपीओतून मिळवलेल्या रकमेतून कंपनी आक्रमक विस्तार योजनांना गती देण्यासाठी गुंतवणूक करील. 2029पर्यंत आपला महसूल सहा पट वाढवण्याचं उद्दिष्ट कंपनीने ठेवलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 10, 2025 2:21 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
अस्थिर शेअर मार्केट तरी या शेअरने दिले दुप्पट रिटर्न, कोणत्या कंपनीचा आणि किती रिस्क?