3 वर्षांत 688% रिटर्न, कंपनीला मिळाली 754.30 कोटींची ऑर्डर, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा शेअर?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
3 वर्षात 688% परतावा देणाऱ्या कंपनीला 754.30 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली, फायलींगनुसार कंपनीला हे संपूर्ण काम 60 दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे. या ऑर्डरची किंमत जीएसटीपूर्वी 662.82 कोटी रुपये आहे आणि एकूण मूल्य 754.30 कोटी रुपये आहे.
पंप निर्मिती करणारी कंपनी शक्ती पंप्स (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज वाढ झाली आहे. बुधवार, 11 डिसेंबर रोजी, कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये याबाबत महत्त्वाची माहिती दिली. या कंपनीला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) कडून 754.30 कोटी रुपयांची ऑर्डर (जीएसटीसह) मिळाली.
कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, "आम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडकडून 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजने' अंतर्गत 25,000 स्टँड-अलोन ऑफ-ग्रिड डीसी सोलर फोटोव्होल्टेइक वॉटर पंपिंग सिस्टम (SPWPS) साठी पत्र मिळालं आहे."
advertisement
या ऑर्डरमध्ये या पंपांचे डिझाईन, उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमीशनिंग करुन द्यायचं आहे. फाइलिंगनुसार, कंपनीला हे संपूर्ण काम 60 दिवसांत पूर्ण करावे लागेल. या ऑर्डरची किंमत जीएसटीपूर्वी 662.82 कोटी रुपये तर एकूण मूल्य 754.30 कोटी रुपये आहे.
कंपनीची सप्टेंबर तिमाहीत आर्थिक कामगिरी पाहता निव्वळ नफा रु. 101.4 कोटी होता. जो मागील वर्षी याच कालावधीत रु. 6 कोटींपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 634.6 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 152.8 कोटी रुपये होता.
advertisement
एप्रिल-सप्टेंबर दरम्यान कंपनीचा एकूण नफा 194.1 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या 6.9 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. या कालावधीत महसूल 1,202.2 कोटी रुपयांवर पोहोचला, जो गेल्या वर्षी 265.8 कोटी रुपये होता. कंपनी उत्पादने आणि शेअर परफॉर्मन्स शक्ती पंप (इंडिया) सौर पंप, ऊर्जा-कार्यक्षम स्टेनलेस स्टील सबमर्सिबल पंप, प्रेशर बूस्टर पंप आणि इतर उत्पादने तयार करते.
advertisement
कंपनीकडे 2 उत्पादन युनिट्स आहेत, त्यांची वार्षिक उत्पादन क्षमता 5,00,000 पंप आणि मोटर्स आहेत. BSE वर शक्ती पंप्सचे शेअर्स 804.30 रुपयांवर बंद झाले. आज शेअर 3.09% किंवा 24.10 रुपयांनी वाढला आहे. या समभागातून गुंतवणूकदारांना उत्कृष्ट नफा होताना दिसत आहे.
1 आठवड्यात 4.53 टक्के, 1 महिन्यात 3.92 टक्के, 3 महिन्यांत 12.39 टक्के परतावा दिला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत 378.25 टक्के परतावा दिला आहे. या शेअर्समधून 1 वर्षात गुंतवणूकदारांना 375.05 टक्के नफा मिळाला आहे. या शेअर्सनी 3 वर्षात 688 टक्के परतावा दिलाय.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2024 11:00 AM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
3 वर्षांत 688% रिटर्न, कंपनीला मिळाली 754.30 कोटींची ऑर्डर, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा शेअर?