RBI Monetary Policy Meeting नंतर वाढलं टेन्शन, बँकिंग शेअर्स आपटले, शेअर्स होल्ड करावी की काढावे?

Last Updated:

RBI Monetary Policy Meeting : SIB चे शेअर्स मागच्या तीन महिन्यात 13 टक्क्यांनी आपटले आहेत. तर HDFC आणि इंड्युस बँकेचे शेअर्स मागच्या तीन महिन्यात फार ग्रोथ करत नसले तरी घसरले नाहीत त्यामुळे ग्रीन झोनमध्ये आहेत.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
मुंबई : RBI ची मॉनिटरी पॉलिसी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत RBI ने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे. बैठकीत एकमताने हा निर्णय घेतल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. या बैठकीनंतर शेअर मार्केट 280 अंकांनी कोसळलं आहे. सेन्सेक्स 280 तर निफ्टी 23500 अंकांच्या आसपास आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे.
CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार करन्सीवर लक्ष ठेवावं लागेल. आंतरराष्ट्रीय मार्केटची स्थिती खराब आहे. ग्रोथवर फोकस आला आहे. रुपयाचं मूल्य वारंवार घसरत आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्येही अस्थिरता आहे. दुसरीकडे या बैठकीनंतर बँकिंगचे शेअर्स आपटले आहेत. ICICI, अॅक्सिस बँकचे शेअर्स पडले आहे. कॅनरा, एसबीआय, बँक ऑफ बडोदाचे शेअर्स देखील आपटले आहेत. यामध्ये फक्त एचडीएफसी बँकेचे शेअर्स तरल्याचं दिसत आहे. श्रीरामा फायनान्स सोडून इतर फायनान्स कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. निफ्टी बँक 158 अंकांनी कोसळले आहेत.
advertisement
SIB चे शेअर्स मागच्या तीन महिन्यात 13 टक्क्यांनी आपटले आहेत. तर HDFC आणि इंड्युस बँकेचे शेअर्स मागच्या तीन महिन्यात फार ग्रोथ करत नसले तरी घसरले नाहीत त्यामुळे ग्रीन झोनमध्ये आहेत. बँक निफ्टी 3.40 टक्क्यांनी मागच्या तीन महिन्यात कोसळलं होतं, मात्र मागच्या 7 दिवसात बऱ्यापैकी रिकव्हर होताना दिसत आहेत.
सध्या तरी बँक निफ्टी किंवा बँकेचे स्टॉक्स निगेटिव्ह असले तरी येत्या तीन महिन्यात पुन्हा हे स्टॉक्स चांगले रिटर्न्स देतील. या पॉलिसीमुळे मार्केट डिसअपॉईंट असल्याचं दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठं नुकसान झालं आहे. सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार बँकिंग सेक्टरमध्ये ग्रोथचं लक्ष्य आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांकडे स्टॉक्स आहेत त्यांना काढण्याची घाई करू नका. होल्ड करा. आणखी तीन महिन्यात अनेक बदल होऊ शकतात. तर गुंतवणुकीसाठी देखील चांगली संधी आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पैसे लावू शकता.
advertisement
(डिस्क्लेमर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
RBI Monetary Policy Meeting नंतर वाढलं टेन्शन, बँकिंग शेअर्स आपटले, शेअर्स होल्ड करावी की काढावे?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement