हलक्यात घेतलं पण खरं झालं! Rich Dad Poor Dad च्या लेखकाची भविष्यवाणी 9 महिन्यात ठरली खरी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जगभरातील शेअर मार्केटमध्ये अस्थिरता असून सोन्याच्या किमती वाढत आहेत. रॉबर्ट कियोसाकी यांनी 9 महिन्यांपूर्वी केलेले भाकीत खरे ठरले आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं 86,000 रुपयांवर पोहोचलं आहे.
जगभरातील शेअर मार्केटमध्ये अस्थिरता कायम आहे. कधी प्रचंड नफा तर दुसऱ्या क्षणी शेअर मार्केट आपटल्याचंही पाहायला मिळत आहे. जगभरातील शेअर बाजारात मोठी उलथापालथ होत आहे. प्रमुख क्रिप्टोकरेंसी असलेल्या बिटकॉइनचीही अवस्था बिकट आहे. पण एक गोष्ट आहे, जी या सगळ्या परिस्थितीतही आपली चकाकी कायम ठेवून आहे ती म्हणजे सोनं.
सोन्याच्या किमती दिवसेंदिवस स्वत:तचा रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. मागच्या 24 तासात पुन्हा एकदा सोनं 1000 रुपयांनी वाढलं. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,000 रुपयांच्या वर पोहोचला आहे. 'रिच डॅड पुअर डॅड' चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी 9 महिन्यांपूर्वी शेअर मार्केट आणि सोन्या चांदीच्या दरांबाबत एक भाकीत केलं होतं. त्यांचं हे भाकीत 9 महिन्यांनी खरं ठरलं आहे. सोनं-चांदीला अडचणीच्या काळातला आधार म्हटलं होतं आणि ते खरं ठरताना दिसत आहे.
advertisement
काय म्हणाले होते रॉबर्ट कियोसाकी?
'रिच डॅड, पुअर डॅड' चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एप्रिल 2024 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी 'सर्व काही बुडबुडा आहे, फुगा फुटणार असं म्हटलं होत. स्टॉक, बॉन्ड, रियल इस्टेट सगळं क्रॅश होणार आहे,' असं म्हटलं होतं. त्यांनी लोकांना सोनं-चांदी खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. आता त्यांची 'सोनं खरेदी करा' ही भविष्यवाणी खरी होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2870 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे, तर देशांतर्गत बाजारात आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याने उच्चांक गाठला आहे.
advertisement
ऑल टाइम हाय सोनं
बुधवारच्या सोन्याच्या ताज्या किमतीनुसार, MCX वर 4 एप्रिलच्या एक्सपायरी असलेल्या सोन्याचा वायदा भाव 87,348 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या उच्चांकावर पोहोचला. तर देशांतर्गत बाजारात 999 शुद्धतेचं 24 कॅरेट सोनं जीएसटी आणि मेकिंग चार्जशिवाय 86,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं.
5 फेब्रुवारीचे सोन्याचे दर
इंडियन बुलियन ज्वैलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाइटनुसार, बुधवार, 5 फेब्रुवारीला सोन्याची किंमत 84,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर गेली. वेगवेगळ्या कॅरेटनुसार सोन्याचे दर काय आहेत जाणून घ्या.
advertisement
24 कॅरेट: 86,000 रुपये प्रति 10 ग्रॅम
23 कॅरेट: 85,518 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 82,220 रुपये प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट: 75,240 रुपये प्रति 10 ग्रॅम
14 कॅरेट: 65,600 रुपये प्रति 10 ग्रॅम

सोन्या चांदीच्या दागिने किंवा कॉईनवरही 3 टक्के GST आणि RTGS लावलेला असतो त्यामुळे किंमती अधिक वाढण्याची शक्यता असते. शिवाय मेकिंग चार्जेसही आकारले जातात. त्यामुळे या दरांच्या वर तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागू शकतात. कोणतंही सोनं घेताना त्याची शुद्धता होलमार्किंग पाहूनच घ्या नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.
advertisement
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
देशभरात सोन्याच्या दागिन्यांची किंमत उत्पादन शुल्क, राज्यांचे कर आणि मेकिंग चार्जमुळे बदलत असते. दागिने बनवण्यासाठी बहुतेक 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो, तर काहीजण 18 कॅरेट सोनं वापरतात. दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉलमार्क असतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेलं असतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 06, 2025 10:23 AM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
हलक्यात घेतलं पण खरं झालं! Rich Dad Poor Dad च्या लेखकाची भविष्यवाणी 9 महिन्यात ठरली खरी