शेअर मार्केटमध्ये चुकीचा सल्ला देणं पडलं महागात, सेबीने ठोठावला पावणे तीन कोटींचा दंड

Last Updated:

या सात जणांनी शेअर्समध्ये पैसे गुंतवावेत यासाठी गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.

News18
News18
मुंबई: शेअर बाजारात गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवता येतो, अशाप्रकारचे कंटेट आजकाल सोशल मीडियावर खूप सहज फिरतात. प्रत्येकाच्या फोनवर काही ठराविक स्क्रोलिंगनंतर अशा प्रकारचे कंटेट येत असतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून करोडो रुपये कमवू शकता अशी दिशाभूल करणारे किंवा गुंतवणुकीशी संबंधित चुकीचा सल्ला देणाऱ्यांसाठी आणि तो ऐकाणाऱ्यांसाठी दोघांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
सेबी (SEBI) ने 7 जणांना 2.83 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या 7 जण गुंतवणूकदारांना शेअर बाजारासंबंधी चुकीचा सल्ला देत होते, असा आरोप आहे. सेबीने गेल्या वर्षी 7 लोकांवर जवळपास 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. दंड न भरल्याने आता त्यांना डिमांड नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रदीप बैजनाथ पांड्या आणि इतर सात जण एका टीव्ही चॅनलवर शेअर बाजाराशी संबंधित कार्यक्रम सादर करत होते.
advertisement
या सात जणांनी शेअर्समध्ये पैसे गुंतवावेत यासाठी गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर या गुंतवणूकदारांनी न्याय मागितला. पांड्या यांच्याशिवाय तोशी ट्रेड, महान इन्व्हेस्टमेंट, मनीष वासनजी फुरिया (एचयूएफ), मनीष वासनजी फुरिया, अल्पा अल्पेश फुरिया, अल्पेश वासनजी फुरिया (एचयूएफ) आणि अल्पेश वासनजी फुरिया यांनाही दंड भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
advertisement
15 दिवसांची मुदत, 5 वर्षांचा प्रतिबंध
सेबीने या सर्व व्यक्तींना 15 दिवसांच्या आत दंड भरण्यास सांगितले आहे. दंड भरण्यात अयशस्वी झाल्यास त्यांची बँक खाती आणि मालमत्ता जप्त केली जाईल, असा इशारा सेबीने दिला आहे. सेबीने यापूर्वीच पांड्या आणि इतर 7 जणांना शेअर बाजारात 5 वर्षांसाठी प्रतिबंधित केले आहे. त्यांनी फसवणूकपूर्ण व्यापारिक गतिविधित भाग घेतला होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
advertisement
काय होता आरोप?
पांड्या ऑगस्ट 2021 पर्यंत एका टीव्ही चॅनलवर विविध कार्यक्रम सादर करत होते. अल्पेश फुरिया या चॅनलवर गेस्ट म्हणून आले होते. ट्विटरसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर बाजारासंबंधी शिफारशी करत होते. पांड्या आणि फुरिया यांच्या 'आज-खरेदी-कल-बेचें' ट्रेडमध्ये संबंध असल्याचं सेबीने पाहिलं. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आणि सेबीने याला नियमांचं उल्लंघन मानलं.
advertisement
शेअर बाजारात गुंतवणूक करताना खूप काळजी घ्यावी. कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा टीव्ही कार्यक्रमांवर आधारित गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः अभ्यास करणे आणि तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे चुकीचे सल्ले देणं किंवा गुंतवणूकदारांची दिशाभूल करणं कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा व्यक्तींविरोधात तातडीनं तक्रारही करायला हवी.
(डिस्क्लेमर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
शेअर मार्केटमध्ये चुकीचा सल्ला देणं पडलं महागात, सेबीने ठोठावला पावणे तीन कोटींचा दंड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement