Share Market Crash: शेअर मार्केटमध्ये पॅनीक मोड, प्री ओपनिंगला 4000 अंकांनी कोसळलं

Last Updated:

मुंबई शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 3540.56 अंकांनी घसरून 71,829.24 वर, निफ्टी 1,367.20 अंकांनी घसरून 21537.25 वर पोहोचला आहे. आशियाई बाजारातही घसरण दिसून येत आहे.

News18
News18
मुंबई: टेरिफनंतर ज्याची भीती होती तेच घडत आहे. शेअर मार्केटमध्ये आज ब्लॅक मंडे होणार अशी भीती निर्माण झाली आहे. प्री-ओपनिंगमध्ये बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स 3540.56 अंकांनी किंवा 4.70 टक्क्यांनी घसरून 71,829.24 वर व्यवहार करताना दिसला. त्याच वेळी, निफ्टी 1,367.20 अंकांनी म्हणजेच 5.97 टक्क्यांनी घसरून 21537.25 पातळीवर व्यवहार करताना दिसला.
दरम्यान, आज आशियाई बाजारात घसरणीसह व्यवहार होत आहेत. गिफ्ट निफ्टी 903.50 अंकांनी घसरत आहे. त्याच वेळी, निक्केई सुमारे 6.93 टक्क्यांनी घसरून 31,591.84 च्या आसपास दिसत आहे. त्याच वेळी, स्ट्रेट टाईम्स 6.79 टक्के कमकुवतपणा दाखवत आहे. तैवानचा बाजार 9.68 टक्क्यांनी घसरून 19,236.70 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर हँग सेंग 9.42 टक्क्यांच्या घसरणीसह 20,696.84 च्या पातळीवर दिसत आहे. दुसरीकडे डॉलरचं मूल्य वाढलं असून पुन्हा एकदा रुपया घसरला आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे त्यांचं टेन्शन वाढलं आहे.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market Crash: शेअर मार्केटमध्ये पॅनीक मोड, प्री ओपनिंगला 4000 अंकांनी कोसळलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement