शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे बुडाले 2 लाख कोटी, स्टॉक ठेवायचे की विकायचे?

Last Updated:

भारतीय शेअर बाजारात 28 मार्च रोजी मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 191 अंकांनी घसरून 77,414.92 वर, निफ्टी 72.60 अंकांनी घसरून 23,519.35 वर बंद झाला.

News18
News18
भारतीय शेअर बाजारात 28 मार्च रोजी मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 191 अंकांनी घसरून 77,414.92 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 72.60 अंकांनी घसरून 23,519.35 अंकांवर स्थिरावला. विशेषतः IT आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांचे मनोबल डळमळीत झाले असून, ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ योजनांचा परिणाम बाजारावर दिसत आहे.
बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. BSE लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 28 मार्च रोजी 412.65 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे 27 मार्च रोजी 414.7 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे गुंतवणूकदारांचे अंदाजे 2.07 लाख कोटी रुपये बुडाले.
काही निवडक शेअर्सनी मात्र बाजारातील नकारात्मकतेच्या पार्श्वभूमीवर चांगली कामगिरी केली. कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 1.88% वाढले, तर हिंदुस्थान युनिलिव्हर, ICICI बँक, टाटा मोटर्स आणि नेस्ले इंडिया यांचे शेअर्स 0.75% ते 1.01% पर्यंत वाढले.
advertisement
दुसरीकडे, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, HCL टेक, मारुती सुझुकी आणि इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. इंडसइंड बँक टॉप लूझर ठरली, जी 3.57% घसरली.
तज्ज्ञांच्या मते, 1 एप्रिलला बाजारातील स्थिती अस्थिर राहू शकते. निफ्टीसाठी 23,400 हा महत्त्वाचा सपोर्ट लेव्हल आहे, तर 23,200 वर आणखी मजबूत सपोर्ट आहे. जर निफ्टी 24,200च्या वर गेला, तर आणखी तेजी येऊ शकते. तसेच, अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणांमुळे जागतिक बाजारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे बुडाले 2 लाख कोटी, स्टॉक ठेवायचे की विकायचे?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement