10 रुपये किंमत, मोठी घसरण होत असलेल्या पेनी स्टॉकमध्ये 9 टक्क्यांची तेजी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बुधवारी मिष्टान्न फूड्स कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 8.06 रुपयांच्या पातळीवर खुले झाले. त्यांनी आपल्या सर्वकालीन नीचांकी पातळीला स्पर्श केला; मात्र काही वेळानंतर परिस्थिती एकदम बदलली.
भारतीय शेअर बाजारात नोव्हेंबर महिन्यात घसरण होत होती. त्या चित्रात डिसेंबर महिन्यात बदल झाला. पहिल्या आठवड्यात बाजारात सुधारणा झाली आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला; मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तेजी आटोक्यात आली आहे. सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद झाले होते. मंगळवारी ते सपाट बंद झाले होते. आज किरकोळ वाढीसह बंद झाले आहेत. काही शेअर्समध्ये तेजी राहिली. मिष्टान्न फूड्स या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या तीन दिवसांपासून मोठी घसरण होत होती. हा एफएमसीजी सेक्टरमधला स्मॉलकॅप शेअर आहे. आजही सुरुवातीच्या कामकाजात हा शेअर 10 टक्के घसरणीनेच उघडला होता; मात्र नंतर त्यात वाढ नोंदवली गेली आहे.
मिष्टान्न फूड्स या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्के लोअर सर्किटसह बंद झाले. तसंच, सोमवारी ते 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह बंद झाले होते. त्याआधी शुक्रवारीही त्यात 10 टक्के घसरण नोंदवली गेली होती. अशा परिस्थितीत गेल्या पाच दिवसांमध्ये या शेअरने 60 टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदवली होती. आज मात्र त्या शेअर्सनी जबरदस्त पुनरागमन केलं.
advertisement
आज, बुधवारी मिष्टान्न फूड्स कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 8.06 रुपयांच्या पातळीवर खुले झाले. त्यांनी आपल्या सर्वकालीन नीचांकी पातळीला स्पर्श केला; मात्र काही वेळानंतर परिस्थिती एकदम बदलली. आज सकाळी 9.50 वाजल्यानंतर या पेनी स्टॉकमध्ये बायर्स पुन्हा सक्रिय झाले आणि 9 टक्क्यांच्या तेजीसह 9.78 रुपयांच्या पातळीवर त्याने आपली इंट्राडे हाय पातळी तयार केली. ती उत्तम रिकव्हरी दर्शवते. मिष्टान्न फूड्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतली उच्चांकी पातळी 25.36 रुपये आहे. त्याची या कालावधीतली नीचांकी पातळी 8.06 रुपये आहे. त्या पातळीला आजच स्पर्श झाला होता.
advertisement
सेबी या बाजार नियामक यंत्रणेने गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी, तिचे प्रमोटर आणि सीएमडी हितेशकुमार गौरीशंकर पटेल यांच्यासह पाच एंटिटीजना कथित आर्थिक गैरव्यवस्थापन, फसवणूक करणारे व्यवहार आणि कॉर्पोरेट प्रशासनातल्या उणिवा यांसाठी पुढच्या आदेशापर्यंत सिक्युरिटी मार्केटमध्ये बंदी घातली होती. त्यानंतर या शेअर्समध्ये मोठी विक्री पाहायला मिळत होती. त्यामुळे एवढी मोठी घसरण झाली होती.
advertisement
मिष्टान्न फूड्स या स्मॉलकॅप कंपनीचा पी/ई रेशो 2.75 आहे. तसंच, तिचं मार्केट कॅपिटलायझेशन 1.03 हजार कोटी रुपये असून, डिव्हिडंड यील्ड 0.011 टक्के आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2024 9:52 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
10 रुपये किंमत, मोठी घसरण होत असलेल्या पेनी स्टॉकमध्ये 9 टक्क्यांची तेजी