Share Market: आठवड्याच्या सुरुवालाच अच्छे दिन, रॉकेटसारखे सुस्साट पळाले 10 शेअर्स

Last Updated:

लार्ज कॅप सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक शेअर (1.72%), रिलायन्स (1.60%), ICICI बँक (1.52%), भारती एअरटेल (1.20%) आणि टाटा स्टील शेअर (1.02%) वाढले.

शेअर मार्केट
शेअर मार्केट
मुंबई : गेल्या आठवड्यातील मोठ्या घसरणीतून सावरत शेअर बाजाराने सोमवारी चांगली सुरुवात केली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने सुरुवातीच्या काही मिनिटांतच 600 हून अधिक अंकांनी झेप घेतली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानेही जवळपास 200 अंकांची उसळी घेतली. बाजारात तेजी असताना रिलायन्स ते एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.
सेन्सेक्स 78700 च्या वर गेला
बीएसई सेन्सेक्स 78,488.64 च्या पातळीवर उघडला, त्याच्या मागील बंद 78,041.598 च्या तुलनेत जोरदार वाढ झाली आणि त्यानंतर त्याची गती आणखी वाढली. बातमी लिहिपर्यंत BSE सेन्सेक्स 692 अंकांनी उसळी घेत 78,743 च्या पातळीवर व्यवहार करत होता. NSE निफ्टी बद्दल विचार करायचा झाला तर, हा निर्देशांक 23,587.50 च्या त्याच्या मागील बंद पातळीवरून वाढला आणि 23,738.20 च्या पातळीवर व्यवहार सुरू झाला आणि काही मिनिटांतच तो 23,792.75 च्या पातळीवर पोहोचला.
advertisement
रिलायन्स ते एअरटेलपर्यंत धाव घेतली
लार्ज कॅप सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक शेअर (1.72%), रिलायन्स (1.60%), ICICI बँक (1.52%), भारती एअरटेल (1.20%) आणि टाटा स्टील शेअर (1.02%) वाढले. JSW Infra Share 2.61%, Paytm Share 2%, GMR Airport Share 1.92% टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्मॉलकॅपमध्ये India Cement Share 8.98%, Star Cement Share 6.54% शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.
advertisement
(इथे दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: आठवड्याच्या सुरुवालाच अच्छे दिन, रॉकेटसारखे सुस्साट पळाले 10 शेअर्स
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement