ग्रे मार्केटमधील गुंतवणूक किती लाभदायी? खरंच रिस्क घ्यावी का? पाहा तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

Gray Market: सध्या चांगल्या परताव्यासाठी अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. काहीजण ग्रे मार्केटचा देखील विचार करतात. ग्रे मार्केटबाबत जाणून घेऊ.

+
ग्रे

ग्रे मार्केटमधील गुंतवणूक किती लाभदायी? खरंच रिस्क घ्यावी का? पाहा तज्ज्ञांचा सल्ला

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : आजकाल शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. कमी पैसे गुंतवून अधिक नफा मिळवण्यासाठी अगदी तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. मात्र अनेकदा काही लोकांच्या सांगण्यामुळे आपण पैसे गुंतवतो आणि त्याचा फायदा आपल्याला मिळत नाही. बऱ्याचदा नुकसान देखील सहन करावं लागतं. शेअर मार्केट हे अनेकांना परिचयाचं झालं असलं तरी ग्रे मार्केट हा सुद्धा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे. इथं गुंतवणूक कशी होते आणि त्याच्यात किती रिस्क असते? याबाबत पुण्यातील गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार विनय नेर्लेकर यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
ग्रे मार्केट ही मुख्यत: वित्तीय रोख्यांची अनियंत्रित आणि अनधिकृत बाजारपेठ आहे. या बाजारातील व्यवहार हे साधारणपणे तेव्हा होतात जेव्हा एखादा समभागाचे बाजारातील व्यवहार काही कारणाने स्थगित अथवा निलंबित केलेले असतात. ग्रे मार्केटमधील व्यापारामध्ये खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील व्यापाराची सर्वस्वी जबाबदारी त्या दोघांवरच असते. त्यामुळे सौदा झालेल्या समभागाचा अधिकृत व्यापार सुरू होईपर्यंत यात जोखीम पत्करावी लागू शकते.
advertisement
ग्रेम मार्केट म्हणजे जोखीम
ग्रे मार्केट हे अदृश्य प्रकारे असून यामध्ये रिस्क ही मोठ्या प्रमाणात असते. गुंतवणूक करून कंपनी जर एनएससी किंवा बीएससी स्टॉक एक्सचेंजवर लवकर लिस्ट झाली नाही तर तुमची तेवढी गुंतवणूक अडकून राहते. परंतु, कंपनी लवकर लिस्ट झाली तर फायदा देखील मिळू शकतो. पण याची शक्यता ही फार कमी असते. जास्तीचे पैसे असतील तरच यामध्ये गुंतवणूक करावी. कारण कमी पैसे असतील तर शेअर मार्केटप्रमाणे यात गुंतवणूक करता येत नाही, असे नेर्लेकर सांगतात.
advertisement
पैसे अडकण्याची शक्यता
ग्रे मार्केटमध्ये व्यवहार हे जोखमीचे असतात. पैसे कधी मिळतील याची निश्चितता देखील नसते. बायसेलर जर ट्रेडर जमून आले तरच ट्रेड केल जात. कारण यामध्ये लॉट साईझ नुसार गुंतवणूक होत असते. शेअर मार्केटप्रमाणे एक दोन शेअर्स इथं खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे गुंतवणुकीची रक्कम मोठी असते. त्यामुळे काही लाखांत गुंतवणूक करणारेच गुंतवणुकीसाठी या पर्यायाचा विचार करतात. परंतु, पैसे अडकण्याची शक्यता जास्त असल्यामुळे सामान्य ट्रेडर याकडे वळत नाहीत, अशी माहिती विनय नेर्लेकर यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/Share Market/
ग्रे मार्केटमधील गुंतवणूक किती लाभदायी? खरंच रिस्क घ्यावी का? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement