ऊर्जा क्षेत्रातल्या शेअर्सला ५ टक्के अपर सर्किट, गुंतवणूकदारांना तब्बल ३ हजार टक्के रिटर्न मिळाले

Last Updated:

विविध क्षेत्रांमधल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी आली. त्यात ग्रीन एनर्जी अर्थात हरित ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सचाही समावेश आहे

फाईल फोटो
फाईल फोटो
भारतीय शेअर बाजारांमध्ये आज, कामकाजाच्या सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विविध क्षेत्रांमधल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी आली. त्यात ग्रीन एनर्जी अर्थात हरित ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सचाही समावेश आहे. सुझलॉन एनर्जी या गुंतवणूकदारांमध्ये प्रसिद्ध असलेल्या शेअरमध्येही आज तेजी दिसून आली. त्या कंपनीच्या शेअरमध्ये पाच टक्के अपर सर्किट लागलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक चार डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधी ही तेजी नोंदवली गेली आहे.
सुझलॉन हा गुंतवणूकदारांमध्ये प्रसिद्ध असलेला स्टॉक आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता त्याने गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. 2022 साली या कंपनीचा शेअर 9 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. आता त्याचं मूल्य 66 रुपयांच्या वर गेलं आहे. ही वाढ 700 टक्क्यांहून अधिक आहे. पाच वर्षांच्या अवधीत या शेअरने 3100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. असं असलं तरी, गेल्या वर्षभरात सुझलॉनच्या शेअरच्या कामगिरीत घसरण झाली असून, त्याने या काळात सुमारे 65 टक्के परतावा दिला आहे. तसंच, सहा महिन्यांच्या काळात त्यात 32 टक्के वाढ झाली आहे.
advertisement
आज, सोमवारी (2 डिसेंबर) सुझलॉन एनर्जीचे शेअर 62.98 रुपये दरावरून पाच टक्क्यांच्या तेजीसह 66.12 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. त्याचसोबत अन्य अनेक एनर्जी स्टॉक्समध्येही चांगली तेजी पाहायला मिळाली आहे. आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर आज 8.5 टक्के वाढून 209.80 रुपयांच्या पातळीवर इंट्रा डे हाय ठरले. टोरेंट पॉवरच्या शेअरमध्ये सात टक्के तेजी नोंदवली गेली आहे. ते 1619.35 रुपयांच्या पातळीवर इंट्राडे हाय ठरले. त्याशिवाय गेल्या चार कामकाज दिवसांपासून अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ नोंदवली जात आहे. आज हे शेअर 9 टक्के वाढीसह 1445 रुपयांच्या पातळीवर पोहोचले.
advertisement
या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरण आढावा बैठक घेणार आहे. ती बैठक चार नोव्हेंबर ते सहा या काळात चालेल. या बैठकीत रिझर्व्ह बँक आणि अन्य नियामक संस्था ग्रीन लँडिंग गाइडलाइन बनवू शकतात, अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
ऊर्जा क्षेत्रातल्या शेअर्सला ५ टक्के अपर सर्किट, गुंतवणूकदारांना तब्बल ३ हजार टक्के रिटर्न मिळाले
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement