PSU Stock: सरकारी स्टॉक 13 टक्क्यांनी वधारले; एका आठवड्यात 24 टक्के रिटर्न मिळाले!

Last Updated:

PSU Stock: टेलिकम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित कंपनी आयटीआय लिमिटेडचे शेअर्स 9 डिसेंबरला वधारले.

फोटो : प्रातिनिधिक
फोटो : प्रातिनिधिक
टेलिकम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित कंपनी आयटीआय लिमिटेडचे शेअर्स 9 डिसेंबरला वधारले. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी तेजी आली आणि स्टॉक प्राई 362 रुपयांपर्यंत पोहोचली. दुसऱ्या सत्रात देखील वाढीचे संकेत मिळत असल्याने जास्त व्हॉल्युम आणि गुंतवणूकदारांचा कल या शेअर्सकडे दिसून येत आहे.
'मनीकंट्रोल'च्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी (9 डिसेंबर) या स्टॉकमध्ये 4 कोटींहून अधिक शेअर्सची देवाण-घेवाण झाल्याने दोन सत्रांत एकूण 12 कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली आहे. या कंपनीला 19 नोव्हेंबर रोजी उत्तराखंड सरकारकडून एक ऑर्डर मिळाली होती. कंपनीला सरकारने उत्तराखंडच्या भूविज्ञान आणि खाण संचालनालयाने मायनिंग डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड मॉनिटरी सिस्टीम अर्थात एमडीटीएसएस प्रकल्पासाठी सुमारे 95 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. यानुसार कंपनी देहराडून, हरिद्वार, उधमसिंगनगर आणि नैनिताल जिल्ह्यात 40 चेक गेट्ससाठी एमडीटीएसएसच्या विकास, अंमलबजावणी आणि देखभालीसाठी एजन्सी म्हणून काम करेल.
advertisement

सर्वांत कमी बोली लावणारी कंपनी

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कंपनी भारतनेट फेज 3 प्रकल्पाच्या 3 पॅकेजेस साठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी होती. पॅकेजेसची किंमत एकूण 4559 कोटी रुपये होती. भारतनेट फेज -3 प्रकल्प देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 16 पॅकेजमध्ये विभागलेला आहे. बीएसएनएलने भारतनेट फेज -3 प्रकल्पाच्या मिडल माइल नेटवर्कचे डिझाइन, पुरवठा, इन्स्टॉलेशन, निर्मिती, अपग्रेडेशन, ऑपरेशन आणि देखभालीसाठी डिझाइन बिल्ट ऑपरेट अँड मेंटेन या मॉडेलसाठी निविदा मागविल्या होत्या.
advertisement
`एनएसई`वर सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारे कंपनीचे शेअर मागील बंदच्या तुलनेत 9 टक्के वधारत 361 रुपयांवर ट्रेडिंग करत होते. गेल्या आठवड्यात आयटीआय कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्के तेजी आली.

कंपनी काय करते?

आयटीआय लिमिटेड ही कंपनी या पूर्वी इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. भारतातील हे एक सेंट्रल पब्लिक सेक्टर युनिट आहे. हे दूरसंचार विभाग, दळणवळण मंत्रालय, भारत सरकारच्या मालकीचे आहे. 1948 मध्ये याची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय बेंगळुरूत आहे. विकीपीडियानुसार, या कंपनीत 1000 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
PSU Stock: सरकारी स्टॉक 13 टक्क्यांनी वधारले; एका आठवड्यात 24 टक्के रिटर्न मिळाले!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement