पुढील आठवड्यात कसा असेल शेअर बाजाराचा कल? महत्त्वाची माहिती समोर

Last Updated:

निफ्टी ऑटो आणि ऑईल अँड गॅस निर्देशांकात सुमारे चार टक्क्यांनी घसरण झाली. तथापि निफ्टी आयटी निर्देशांक सुमारे एका टक्क्याने वधारला.

शेअर मार्केट
शेअर मार्केट
शेअर बाजारात 14 नोव्हेंबर रोजी संपलेल्या सलग दुसऱ्या सप्ताहात मुख्य निर्देशांकांसह ब्रॉडर निर्देशांकामध्ये घसरणीचा कल कायम राहिला. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकांत अनुक्रमे 4-4 टक्के घसरण झाली. एफआयआयचा विक्रीकडे असलेला कल, भारतीय कंपन्याचे कमकुवत रिझल्ट आणि वाढत्या महागाईची चिंता यामुळे या आठवड्यात बेंचमार्क 2.5 टक्क्यांनी घसरला. तसेच नफेवसुली कायम राहिली. या सप्ताहात बीएसई निर्देशांक 1906.01 अंकांनी अर्थात 2.39 टक्क्यांच्या घसरणीसह 77,580.31 वर बंद झाला. निफ्टी 50 615.5 अंक अर्थात 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह 23,532.70 वर बंद झाला.
बीएसई मिडकॅप निर्देशांक, बीएसई स्मॉल कॅप आणि बीएसई लार्ज कॅप निर्देशांकात अनुक्रमे 3.9 टक्के, 4.6 टक्के आणि 2.6 टक्के घसरण झाली. सेक्टोरल निर्देशांकांचा विचार करायचा झाला तर निफ्टी मेटल आणि पीएसयू बँक निर्देशांकांत 5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. निफ्टी एफएमसीजी आणि हेल्थकेअर निर्देशांकात 4 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. निफ्टी ऑटो आणि ऑईल अँड गॅस निर्देशांकात सुमारे चार टक्क्यांनी घसरण झाली. तथापि निफ्टी आयटी निर्देशांक सुमारे एका टक्क्याने वधारला.
advertisement
बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात 4.6 टक्क्यांनी घसरण झाली. यात कोपरान, ग्लोबल स्पिरिट्स, अँटनी वेस्ट हँडलिंग सेल, ॲडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज, बीएएसएफ इंडिया, धर्मज क्रॉप गार्ड, पुरवणकारा, इन्सेक्टिसाइड्स इंडिया, आयएफजीएफ रिफॅक्टरिज, आयआयएफएल सिक्युरिटीज, विष्णू केमिकल्स, हिताची एनर्जी इंडिया, टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया),सी.ई. इन्फो सिस्टीम (मॅप माय इंडिया), रोटो पंप्स, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया या शेअर्सचा लूजर्समध्ये समावेश होता.
advertisement
दुसरीकडे पिक्स ट्रान्समिशन, जेएसडब्ल्यू होल्डिंग्ज, सास्केन टेक्नॉलॉजीज, नलवा सन्स इन्व्हेस्टमेंट, शंकरा बिल्डिंग प्रॉडक्ट्स, न्यूलँड लॅबोरेटरीज, बँको प्रॉडक्ट्स (इंडिया) आणि डिशमॅन कार्बोजेन एमसिसमध्ये 12 ते 28 टक्क्यांपर्यंत तेजी दिसली.
पुढील आठवड्यात कसा असेल बाजाराचा कल?
कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले यांच्या मते, वीकली चार्टनुसार निफ्टीने तांत्रिकदृष्ट्या एक दीर्घ बिअरिश कँडल तयार केली आहे आणि डेली चार्टवर त्याने लोअर टॉप फॉर्मेशन केलं आहे. ही गोष्ट काही अंशी नकारात्मक आहे. सध्या बाजाराची स्थिती कमकुवत असून तो ओव्हरसोल्ड देखील आहे. आता पोझिशनल ट्रेडर्ससाठी 200 डे एसएएम अर्थात 23500/77400 (सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज) एक मोठा सपोर्ट झोन म्हणून काम करेल. हा वरील बाजूला कायम राहिल्यास आपल्याला निफ्टीत एक पूल बॅक रॅली पाहायला मिळू शकते. या रॅलीमुळे बाजार 23,800-24,000/78,500-79,000 पर्यंत उसळू शकतो. तथापि 23,500/77400 च्या खाली घसरण वाढू शकते आणि 23,300-23,200/77000-76,000 पेक्षा खालची पातळी दिसू शकते.
advertisement
``बँक निफ्टीच्या ट्रेडर्ससाठी देखील 200 डे एसएएम अर्थात 49,750 चा महत्त्वाचा सपोर्ट झोन असेल. जर हा यापेक्षा वधारला तर तो 50,900-51,200 पर्यंत वाढू शकतो. तथापि, 49,750 किंवा 200 दिवस एसएमए गडगडल्यास त्याची घसरण वाढू शकते. त्यामुळे बँक निफ्टी 49,300-49,000 पर्यंत घसरू शकतो. त्यामुळे शॉर्ट टर्म ट्रेडर्सने सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच अतिशय सावधपणे निवडक गोष्टी कराव्यात. कारण खालच्या स्तरावर अडकण्याची जोखीम असेल, असे आठवले यांनी सांगितले.
advertisement
एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे यांनी सांगितले की, गुरुवारी निफ्टी त्याच्या 200 डे ईएमएजवळ बंद झाला. त्यामुळे डेली चार्टवर 'ग्रेव्हस्टोन डोजी'सारखा पॅटर्न तयार झाला. हा मंदीच्या शक्यतेचे संकेत देतो. तो उसळल्यास ते विक्रीचे संकेत आहेत. निर्देशांक एका महत्त्वाच्या ईएमएच्या पातळीजवळ ओव्हरसोल्ड झोनमध्ये घुटमळतोय. बाजारात एका पुलबॅकची शक्यता आहे. पण या शक्यतेकडे विक्रीची संधी म्हणून पाहायला हवं. जर निफ्टी 200-डे ईएमए पेक्षा खाली घसरला तर विक्रीसाठी दबाव वाढू शकतो. निफ्टीला 23,450 वर सपोर्ट मिळतोय, पण 23,650 वर रझिस्टन्सची शक्यता दिसते. हा निफ्टीचा शॉर्ट टर्म ट्रेडिंग कालावधी असू शकतो.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
पुढील आठवड्यात कसा असेल शेअर बाजाराचा कल? महत्त्वाची माहिती समोर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement