नाताळाच्या आठवड्यात हे पाच शेअर खरेदी करा, 38 टक्के फायदा, आलेखही चढता!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
गेल्या काही दिवसांमध्ये बाजारात मोठे चढ-उतार असूनही पाच शेअर्समध्ये सातत्याने सुधारणा होत असताना दिसत आहे.
मुंबई : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सातत्याने घसरण होत होती; मात्र आज बाजारात पुन्हा तेजी आली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री जवळपास थांबली आहे. त्यामुळे जागतिक बाजारानुरूप भारतीय शेअर बाजारातलं कामकाज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांना सावध राहण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बाजारात मोठे चढ-उतार असूनही पाच शेअर्समध्ये सातत्याने सुधारणा होत असताना दिसत आहे. आगामी काळातही त्या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. हे पाच शेअर्स कोणते, याबद्दल जाणून घेऊ या. अर्थात, इथे दिलेली माहिती हा तज्ज्ञांनी वर्तवलेला फक्त अंदाज आहे. प्रत्येकाने गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने आणि स्वतःच्या जोखमीवरच करावी.
मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड
मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड लेटेस्ट अॅव्हरेज स्कोअर 10 आहे. तो एका आठवड्यापूर्वी 9 होता. तसंच, एका महिन्यापूर्वी तो सात होता. या शेअरला सहा मार्केट एक्स्पर्ट्सनी स्ट्राँग बाय रेटिंग दिलं आहे. तसंच, यात 30 टक्के तेजी येण्याची शक्यता वर्तवली आहे. हा मिडकॅप स्टॉक आहे. या कंपनीचं मार्केट कॅपिटल 10,362 कोटी रुपये आहे.
advertisement
टायटन कंपनी लिमिटेड
टायटन कंपनी लिमिटेड कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 2,97,870 कोटी रुपये आहे. हा लार्ज कॅप कॅटेगरीचा स्टॉक आहे. या कंपनीचा लेटेस्ट अॅव्हरेज स्कोअर 5 होता. एका आठवड्यापूर्वी तो चार होता, तर एका महिन्यापूर्वी तो तीन होता. या शेअरला 29 विश्लेषकांनी बाय रेटिंग दिलं आहे. या शेअरमध्ये 37 टक्क्यांहून अधिक अपसाइड पोटेन्शियल आहे.
advertisement
रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्ज लिमिटेड
रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्ज लिमिटेड या कंपनीचं मार्केट कॅप 23,256 कोटी रुपये आहे. त्याचा लेटेस्ट अॅव्हरेज स्कोअर आठ आहे. तो एका आठवड्यापूर्वी सात, तर एका महिन्यापूर्वी सहा होता. हा शेअर खरेदी करण्याचं रेटिंग पाच विश्लेषकांनी दिलं आहे. त्यात 29 टक्क्यांहून अधिक तेजीची शक्यता आहे.
शाफलर इंडिया लिमिटेड (Schaeffler India Ltd.)
advertisement
शाफलर इंडिया लिमिटेड कंपनीचा स्टॉक लार्जकॅप कॅटेगरीचा असून, कंपनीची मार्केट कॅप 52,241 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सचा लेटेस्ट अॅव्हरेज स्कोअर 6 आहे. एका आठवड्यापूर्वी तो पाच होता, तर एका महिन्यापूर्वी तो चार होता. या स्टॉकला 9 तज्ज्ञांनी होल्ड रेटिंग दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की येत्या काही महिन्यांमध्ये या स्टॉकमध्ये 38 टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते.
advertisement
बजाज फिनसर्व्ह लिमिटेड
बजाज फिनसर्व्ह लिमिटेड कंपनीची मार्केट कॅप 2,53,901 कोटी रुपये आहे. या शेअरचा सध्याचा अॅव्हरेज स्कोअर 7 आहे. तो एका आठवड्यापूर्वी सहा होता, तर एका महिन्यापूर्वी पाच होता. नऊ विश्लेषकांनी हा शेअर खरेदी करण्याचं रेटिंग दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की येत्या काही महिन्यांमध्ये त्यात 30 टक्क्यांहून अधिक तेजी येऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 23, 2024 10:25 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
नाताळाच्या आठवड्यात हे पाच शेअर खरेदी करा, 38 टक्के फायदा, आलेखही चढता!