5000 ची SIP केली तर मला किती महिन्यांत मिळतील 1,00,00,000?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
5000 ची SIP करेल तुम्हाला कोट्यवधींचा मालक, किती महिन्यांसाठी गुंतवाल पैसे?
मुंबई : अलीकडच्या काळात, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा पर्याय लोकांच्या पसंतीस पडत आहे. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून एसआयपी हे एक चांगले साधन आहे. भरपूर संपत्ती निर्माण करण्यात आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट्यं साध्य करण्यात एसआयपी मदत करू शकते. एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्यात 5 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास किती कालावधीत त्यातून कोट्यवधी रुपयांचा रिटर्न मिळवता येऊ शकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. तुमच्याही मनात असा प्रश्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
एसआयपीच्या माध्यमातून एखादी व्यक्ती कोट्यधीश होऊ शकते. रेग्युलर एसआयपी, स्टेप-अप एसआयपी, फ्लेक्सिबल एसआयपी असे एसयआपीचे प्रकार आहेत. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही स्वत:साठी योग्य एसआयपी निवडू शकता.
पाच हजार रुपयांच्या मासिक एसआयपीतून एक कोटी रुपयांचा रिटर्न मिळवण्यासाठी किती वेळ लागेल हे आपण जाणून घेऊया. तुम्हाला एसआयपीवर दरवर्षी सरासरी 12 टक्के रिटर्न मिळाला तर 26 वर्षांत 1.07 कोटी रुपयांचा फंड जमा होऊ शकतो. तुम्हाला दरवर्षी सरासरी 15 टक्के रिटर्न मिळाल्यास 22 वर्षांत तुम्हाला 1.03 कोटी रुपये मिळू शकतात. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर जर 18 टक्के रिटर्न मिळाला तर फक्त 20 वर्षांत तुम्हाला 1.17 कोटी रुपये मिळू शकतात.
advertisement
माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्यात किती रुपयांची गुंतवणूक करावी? असा देखील प्रश्न काहीजणांना पडतो. किती रुपयांची गुंतवणूक करावी हे ठरवण्यासाठी सर्वात अगोदर आपलं गुंतवणुकीचं आणि परतावा मिळवण्याचं टारगेट निश्चित करा.
आपलं उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब करा. त्यानंतर किती काळासाठी गुंतवणूक करायची आहे, हे निश्चित करा. शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे एक ते तीन वर्षांचे पर्याय उपलब्ध आहेत. मिडियम टर्म गुंतवणूक ही तीन ते पाच वर्षे तर लाँग टर्म गुंतवणूक ही पाच वर्षांपेक्षा जास्त काळासाठी असते. याशिवाय तुमची रिस्क घेण्याची कितपत तयारी आहे, याचा देखील विचार करा.
advertisement
सर्व बचत म्युच्युअल फंडात गुंतवणे योग्य नाही, असंही आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तुम्ही काही पैसे सोनं, कर्ज, मालमत्ता इत्यादींमध्येही गुंतवू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2024 2:55 PM IST