पारंपरिक गुंतवणुकीला बायबाय करा! महिलांसाठी गुंतवणुकीचे जबरदस्त पर्याय, पैसा होईल डबल

Last Updated:

महिलांसाठी स्मार्ट गुंतवणुकीचा सल्ला: सोनं, म्युच्युअल फंड आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ, महिलांनी गुंतवणुकीत बदल करायला हवा का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

Women
Women
मुंबई: आजच्या काळात महिलांनी संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? गुंतवणूक कुठे आणि कशी करावी? सोनं घ्यावं की म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकावेत?
सोनं – गुंतवणूक की केवळ दागिना?
अनेक महिलांसाठी सोनं म्हणजे संपत्तीचं प्रतिक! घरातील वडीलधारी मंडळी देखील सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. मात्र, अभिनेत्री देबिना बनर्जी सांगतात की, आजच्या काळात सोनं खरेदी करण्याचा पारंपरिक विचार बदलण्याची गरज आहे. ज्वेलरीऐवजी सोनं गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल, तर सोनं ETF (Gold ETF) किंवा डिजिटल गोल्ड हा चांगला पर्याय असतो.
advertisement
भारतीय मानसिकतेनुसार सोनं विकणं टाळलं जातं, त्यामुळे ते गुंतवणुकीसाठी किती उपयोगी? जड दागिने फक्त खास प्रसंगीच वापरले जातात, बाकी वेळी ते लॉकर्समध्ये पडून राहतात. त्यामुळे पेपर गोल्ड किंवा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणे अधिक शहाणपणाचे ठरू शकते.
गुंतवणुकीचा पहिला नियम – ‘सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नका’
देबिना म्हणतात की, "Don't keep all your eggs in one basket" हा गुंतवणुकीचा महत्त्वाचा नियम आहे. म्हणजेच, सगळे पैसे एका प्रकारच्या गुंतवणुकीत न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
advertisement
सोन्याबरोबर आणखी कुठे गुंतवणूक करावी?
म्युच्युअल फंड्स: लांब पल्ल्यासाठी आणि स्थिर परताव्यासाठी योग्य पर्याय
इक्विटी: थोडी जोखीम असली तरी दीर्घकालीन नफा मिळवू शकतो
सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP): लहान रकमेपासून सुरुवात करता येते
Fixed Deposits (FD): स्थिर परताव्यासाठी सुरक्षित पर्याय
गोल्ड ETF: पारंपरिक सोन्याच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि द्रव्य स्वरूपात उपलब्ध
advertisement
महिलांसाठी म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा चांगला पर्याय का आहे?
फायनान्शियल प्लॅनर पूजा भिंडे सांगतात की, म्युच्युअल फंड्स हे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहेत. शेअर बाजारासारखी मोठी जोखीम न घेता महिलांना म्युच्युअल फंड्सच्या मदतीने आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येऊ शकते. महिलांनी आपल्या वयानुसार गुंतवणुकीचे प्रमाण ठरवावे. उदा. जर तुमचे वय ३० असेल, तर ३०% सुरक्षित गुंतवणुकीत आणि ७०% इक्विटी व म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवावे असा गुंतवणुकीचा नियम सांगतो असं पूजा भिंडे म्हणतात.
advertisement
कोणते म्युच्युअल फंड घ्यावेत पूजा भिंडे यांनी दिला सल्ला
ICICI Prudential Bluechip Fund
Kotak Emerging Equity Fund
Parag Parikh Flexi Cap Fund
Invesco India Small Cap Fund
SBI Contra Fund
SIP सुरू करण्याचा फायदा:
महागाईच्या दरापेक्षा चांगला परतावा मिळतो
दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठा नफा मिळवता येतो
१०,००० रुपयांच्या SIP मुळे ३० वर्षांत ३.५ कोटी रुपये मिळू शकतात!
advertisement
आर्थिक शिस्तीशिवाय संपत्ती निर्माण होऊ शकत नाही!
महिला खर्चाच्या सवयी सुधारतील तर आर्थिक स्थितीही सुधारेल. खर्च आणि गुंतवणूक यांचे योग्य संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. क्रिप्टोकरन्सी आणि 'जलद पैसे कमावण्याच्या' योजनांपासून सावध राहा. रिटायरमेंट प्लॅनिंग सुरुवातीपासून करा, म्हणजे भविष्यात आर्थिक चिंता राहणार नाही.
सोन्यात गुंतवणूक करण्याआधी पेपर गोल्ड, डिजिटल गोल्ड आणि ETF याचा विचार करा. SIP आणि म्युच्युअल फंड्स महिलांसाठी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा चांगला मार्ग आहे. सर्व गुंतवणुकी एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवा. फायनान्शियल प्लॅनिंग उशिरा सुरु झालं तरी हरकत नाही, पण सुरु करणं महत्त्वाचं!
मराठी बातम्या/मनी/Share Market/
पारंपरिक गुंतवणुकीला बायबाय करा! महिलांसाठी गुंतवणुकीचे जबरदस्त पर्याय, पैसा होईल डबल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement