Stock Market Crash: 1987 इतिहासाची पुनरावृत्ती, तज्ज्ञांना ज्याची भीती तेच घडलं, टेरिफने मार्केट हादरलं

Last Updated:

7 एप्रिल 2025 रोजी शेअर बाजारात 1987 सारखी परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे. तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Share Market Crash
Share Market Crash
7 एप्रिल 2025 रोजी शेअर बाजारात 1987 सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार का अशी भीती निर्माण झाली आहे. शेअर मार्केटच्या प्री ओपनिंगला 4000 अंकांनी शेअर मार्केट कोसळलं, तर मार्के उघडल्यानंतर 2200 अंकांहून अधिक मार्केट डाऊन होतं. त्यामुळे आजचा मंडे ब्लॅक मंडे गुंतवणूकदारांसाठी ठरला. अमेरिकन बाजार आधीच मोठ्या घसरणीचा सामना करत असून, गुंतवणूकदारांचे लक्ष आता माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांकडे लागले आहे.
1987 चा ब्लॅक मंडे: इतिहासातील सर्वात वाईट दिवस
शेअर बाजाराच्या इतिहासात 19 ऑक्टोबर 1987 हा दिवस "ब्लॅक मंडे" म्हणून ओळखला जातो. या दिवशी अमेरिकेच्या Dow Jones निर्देशांकात एका सत्रात तब्बल 22.6% घसरण झाली होती. ही एकाच दिवशी झालेली सर्वात मोठी घसरण होती आणि तिचा परिणाम अमेरिका, युरोप, आशिया ते ऑस्ट्रेलिया अशा जागतिक बाजारांवर झाला होता. यामुळे हा पहिला "ग्लोबल शेअर बाजार क्रायसिस" ठरला.
advertisement
2025 मध्ये पुन्हा तसाच धोका?
CNBC च्या 'मॅड मनी' शोचे होस्ट आणि हार्वर्ड लॉ ग्रॅज्युएट जिम क्रॅमर यांनी इशारा दिला आहे की, सोमवार, 7 एप्रिल रोजी जेव्हा बाजार खुलेल, तेव्हा परिस्थिती 1987 च्या ब्लॅक मंडे ठरणार का अशी स्थिती होती. जर डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्लोबल ट्रेड वॉर शांत करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, तर बाजारात प्रचंड पडझड होऊ शकते. मार्केट बंद होताना काय स्थिती आहे त्यावर उद्याचा मूड देखील ठरू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांना आजचा दिवस ब्लॅक मंडेसारखा ठरेल अशी भीती आहे.
advertisement
शुक्रवारीची (4 एप्रिल) मोठी घसरण – COVID-19 नंतरची सर्वात मोठी
Dow Jones Industrial Average (DJIA): 5.50% नी घसरून 38,314.86 वर बंद
Nasdaq Composite: 5.82% नी घसरून 15,587.79 वर
S&P 500: सुमारे 6% नी घसरून 5,074.08 वर
या एका दिवसातच बाजारातून तब्बल 5 ट्रिलियन डॉलरहून अधिकची गुंतवणूक साफ झाली. ही गुंतवणूकदारांसाठी मोठी आर्थिक धक्का ठरली आहे.
advertisement
1987 मध्ये काय घडलं होतं?
त्या दिवशी शेअर बाजारातील तंत्राधारित (algorithm-based) ट्रेडिंग, गुंतवणूकदारांमधील भीती आणि बाजारातील लिक्विडिटीची कमतरता यांसारख्या घटकांमुळे 3 दिवसांत मोठी घसरण झाली आणि शेवटच्या दिवशी 22% पेक्षा अधिक मार्केट कोसळले. यानंतरच "सर्किट ब्रेकर" सारख्या संरक्षणात्मक उपाययोजना आणल्या गेल्या.
7 एप्रिलला बाजारात पुन्हा असा ब्लॅक मंडे होईल की नाही, हे ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि जागतिक आर्थिक वातावरणावर अवलंबून असेल. मात्र, तज्ज्ञांचा इशारा गंभीर असून, गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Stock Market Crash: 1987 इतिहासाची पुनरावृत्ती, तज्ज्ञांना ज्याची भीती तेच घडलं, टेरिफने मार्केट हादरलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement