SIP होल्ड करावी, टॉपअप करावी की Exit? एक्सपर्टने दिला पैसे कमवण्याचा 'गुरुमंत्र'

Last Updated:

AI तुमची नोकरी खाणार नाही... तुमचं पोर्टफोलिओ सॉलिड बनवणार! SIP ला आऊट म्हणायच्या आधी थांबा, Big Bull प्लेअर अजून क्रीजवर आहे!

Mutual Fund
Mutual Fund
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. निफ्टी आणि सेंसेक्सने मागील नऊ वर्षात सतत पोझिटिव्ह रिटर्न दिले, मात्र यंदा बाजार घसरत आहे. पण तज्ज्ञांच्या मते, हीच घसरण म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आहे.शेअर बाजारात मोठ्या घसरणीनंतर इन्व्हेस्टर्समध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशावेळी शेअर मार्केटमधून लोक पैसे काढत आहेत. मात्र SIP चं काय करायचं असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडलाय, त्याचं उत्तर एक्सपर्टने दिलं.
'निफ्टी' म्हणजे मोहम्मद अजहरुद्दीन – तीन सेंच्युरीनंतर एकदा आउट होणे नॉर्मल
"मोहम्मद अजहरुद्दीनने टेस्ट कारकिर्दीतील पहिल्या तीन सामन्यात तीन शतकं झळकावली, पण चौथ्या सामन्यात तो फ्लॉप गेला. त्यामुळे तो खराब प्लेअर ठरत नाही!" असं उदाहरण देत तज्ञांनी बाजाराची स्थिती स्पष्ट केली. निफ्टीने मागील 9 वर्षात सतत पॉझिटिव्ह रिटर्न दिले आहेत. त्यामुळे यंदा एक वर्ष निगेटिव्ह असणे स्वाभाविक आहे. पण याच काळात स्मार्ट इन्व्हेस्टर्सनी SIP आणि टॉप-अपसारख्या योजना सुरू ठेवाव्यात, असं तज्ज्ञ सांगत आहेत.
advertisement
स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये अजून घसरण शक्य
गेल्या काही महिन्यांत स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी तेजी झाली होती. पण सध्या या शेअर्सची वैल्यूएशन त्यांच्या हिस्टोरिकल सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अजून घसरण होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी इन्व्हेस्टर्सना असा सल्ला दिला आहे की, स्मॉलकॅपमध्ये मोठी गुंतवणूक टाळा, SIP सुरू ठेवा आणि फक्त मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुम्हाला दीर्घ काळासाठी मोठा फायदा मिळू शकतो.
advertisement
ट्रम्पच्या टॅरिफ वॉरमुळे जागतिक बाजारात गोंधळ!
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली आहे. विशेषतः IT आणि ऑटोमोबाईल क्षेत्र यावर मोठा परिणाम होतोय. पण भारतीय IT कंपन्या अजूनही सुरक्षित आहेत. अमेरिकेने चीनकडून सॉफ्टवेअर घेतलं असतं, तर तेव्हाच त्यांचे डेटा लीक झाले असते. भारतातील IT कंपन्या सुरक्षितता, स्वस्त सेवा आणि एफिशियन्सी देतात" – असं तज्ज्ञांचं मत आहे.
advertisement
AI मुळे IT क्षेत्रात क्रांती, घाबरायचं नाही, गुंतवणूक करा!
AI (Artificial Intelligence) येण्यामुळे अनेकांना IT सेक्टरची चिंता आहे. पण तज्ज्ञांच्या मते AI जुन्या नोकऱ्या काढून टाकेल, पण नव्या अपॉर्चुनिटी निर्माण करेल.AI वर काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.
advertisement
कुठे गुंतवणूक करायची आणि कुठे नाही?
कुठे पैसे गुंतवाल?
लार्जकॅप स्टॉक्स
बँकिंग आणि फायनान्स
IT कंपन्या (AI फोकस असलेल्या)
कंझ्युमर ड्युरेबल्स
कोणते सेक्टर टाळाल:
लो फ्लोटिंग स्टॉक्स
स्मॉलकॅप आणि मिडकॅप
अनसिक्योर्ड लेंडिंग NBFC कंपन्या
SIP इन्व्हेस्टर्ससाठी 'गोल्डन चान्स'!
सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे की, सध्या बाजार Fair Value Zone मध्ये आहे. त्यामुळे SIP सुरू ठेवणे फायदेशीर ठरणार आहे. मात्र, मार्केट अजून स्वस्त झाल्यावरच टॉप-अप करायला सांगितलं आहे. शेअर बाजारात चढ-उतार हे नॉर्मल आहे. आता बाजार थोडा गारद झाला आहे, गुंतवणूक सुरू ठेवण्याची पण हीच वेळ आहे. सध्या जरी निफ्टीचा वाईट काळ सुरू असला तरी पेन्शन ठेवा, जेव्हा हा काळ जाईल तेव्हा निफ्टी सेंच्युरीवर असेल त्यासाठी मात्र 18 ते 24 महिन्यांपर्यंतही वाट पाहावी लागू शकते त्यामुळे गुंतवणूकदारांनी याकडे संधी म्हणून पाहावं आणि SIP मध्ये गुंतवणूक करावी, आधीच केली असेल तर तुम्ही होल्ड करा पण Exit करून तुमचा तोटा होऊ शकतो असं दावा एक्सपर्टने केला आहे.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
SIP होल्ड करावी, टॉपअप करावी की Exit? एक्सपर्टने दिला पैसे कमवण्याचा 'गुरुमंत्र'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement