Share Market: स्मॉलकॅपमध्ये पैसे गुंतवायचे की विकायचे, एक्सपर्टने थेट सांगितलं कुठे रिस्क?

Last Updated:

भारतीय शेअर बाजारात सध्या अस्थिरता आहे. स्मॉल आणि मिडकॅप स्टॉक्स महाग आहेत, त्यामुळे गुंतवणूक धोक्याची ठरू शकते. एक्स्पर्ट्सनी क्वालिटी स्टॉक्समध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

News18
News18
मुंबई: भारतीय शेअर बाजारात सध्या प्रचंड अस्थिरता आली आहे. पाच महिन्यांपासून कोसळत असलेल्या शेअर मार्केटने बुधवारी 5 मार्चला ब्रेक घेतला आणि त्यानंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. हा दिलासा फार काळ टिकला नाही, याचं कारण म्हणजे छोटी गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे कालही बुडाले आहेत. स्मॉल आणि मिडकॅप स्टॉक्स बाबतीत एक्स्पर्ट्स अजूनही गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा इशारा देत आहेत. असं नेमकं काय घडणार आहे? तुम्ही या शेअरमध्ये पैसे गुंतवताना काय काळजी घ्यायला हवी ते एक्सपर्ट्सने सांगितलं आहे.
सीएनबीसी आवजने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही आठवड्यांपासून शेअर बाजार सतत रेड झोनमध्ये होता. मात्र, बुधवारी निफ्टीने 1 टक्क्याने वाढ घेत बाजारात थोडासा दिलासा दिला. पण हा Bottom Buy करण्याची वेळ आहे का? मोतीलाल ओसवाल फिनान्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड गौतम दुग्गड यांच्या मते, बाजारातील ही घसरण तात्पुरती आहे. पण स्मॉल आणि मिडकॅप स्टॉक्स अजूनही महागड्या किमतीवर ट्रेड करत आहेत. त्यामुळे यामध्ये पैसे गुंतवणं सध्या धोक्याचं ठरू शकतं.
advertisement
गेल्या काही आठवड्यांत लार्ज कॅप शेअर्समध्ये मोठा करेक्शन झाला आहे. निफ्टी 50 चा PE रेशो 18.5 वर आला आहे (Long Term Average 20.4) म्हणजेच निफ्टी आता डिस्काउंटवर ट्रेड होत आहे. मिडकॅपचा PE रेशो हा 35 वरून 27 वर आला आहे – पण तरीही तो निफ्टीच्या तुलनेत 50% महाग आहे. स्मॉलकॅपचा PE 24 वरून 21 वर आला आहे – पण हा इंडेक्स अजूनही 20% महाग आहे.
advertisement
मिडकॅप आणि स्मॉल कॅपची काय स्थिती?
गौतम दुग्गड यांच्यानुसार, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात हायप इन्व्हेस्टमेंट झाली होती. त्यामुळे त्यांची किंमत अजूनही स्वस्त वाटत नाहीये. मोठ्या गुंतवणूकदारांनी आधीच छोट्या स्टॉक्समध्ये नफा कमावून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. रिटेल इन्व्हेस्टर्स अजूनही लालचीतून छोटे स्टॉक्स घेत आहेत – पण याच गोष्टीने अनेक जणांचे पोर्टफोलिओ बुडतील, असा इशारा एक्स्पर्ट्सने दिला आहे.
advertisement
एमडी नीलेश शाह काय म्हणाले?
कोटक महिंद्रा AMC चे एमडी नीलेश शाह यांच्या मते, बाजार आता सामान्य पातळीवर आला आहे. पण गुंतवणूकदारांनी फक्त क्वालिटी स्टॉक्समध्येच पैसे लावायला पाहिजेत. मजबूत मॅनेजमेंट, कर्ज कमी, कंपनीची ग्रोथ चांगली आणि लाँग टर्म व्हिजन असलेल्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायला हवी. त्याआधी कंपनीचे मागच्या तीन वर्षातली आणि सहा महिन्यातले रिपोर्ट देखील तपासून पाहायला हवेत.
advertisement
कोणत्या फंड्समध्ये किती रिस्क
सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार एक्सपर्ट्सच्या मते, Large Cap फंड्स, शेअर्स डिस्काउंटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये पैसे टाका. मिडकॅपसाठी अजून थोडी कड काढा, अजून महाग आहेत त्यामुळे पैसे अडकवून नुकसान होऊ शकतं. स्मॉल कॅप फंड्स, शेअर्समध्ये हाय रिस्क, महाग आहेत. त्यामुळे सध्या त्यात गुंतवणूक करणं टाळाच. AI Impactमुळे IT सेक्टर सध्या Accumulation मोडवर आहे.
advertisement
गुंतवणूकदारांनी काय करावं?
लार्ज कॅप शेअर्समध्ये SIP सुरू ठेवा. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये FOMO टाळा. फक्त क्वालिटी स्टॉक्स वर फोकस करा. इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर व्हायरल टिप्सवर विश्वास ठेवू नका. भाव खाली गेला म्हणून स्वस्त नाही, कंपनी क्वालिटी बघा. शॉर्ट टर्म मध्ये कोणी श्रीमंत होत नाही". SIP चालू ठेवा. मोठ्या स्टॉक्समध्ये गोल्डन चान्स मिळतोय, पण छोटे स्टॉक्स अजूनही जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतायत.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: स्मॉलकॅपमध्ये पैसे गुंतवायचे की विकायचे, एक्सपर्टने थेट सांगितलं कुठे रिस्क?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement