अमेरिकेच्या निर्णयामुळे शेअर मार्केटला येणार अच्छे दिन! 3 महिन्यात जे घडलं नाही ते आज होणार?

Last Updated:

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धात मोठा निर्णय घेतल्याने जागतिक बाजारात उसळी पाहायला मिळत आहे. Dow Jones मध्ये 3,000 अंकांची वाढ झाली. भारतीय बाजारातही रॅलीची शक्यता आहे.

News18
News18
मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धात मोठा निर्णय घेतल्याने जागतिक बाजारात उसळी पाहायला मिळत आहे. अमेरिकेने बहुतेक देशांवरील टॅरिफ ९० दिवसांसाठी स्थगित केल्याने आणि केवळ चीनवर टॅरिफ १२५% पर्यंत वाढवल्याने, गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. याचा थेट फायदा आज भारतीय शेअर बाजारात दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकी बाजारात ऐतिहासिक उसळी
ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अमेरिकी बाजारात २००८ नंतरची सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली. Dow Jones मध्ये जवळपास 3,000 अंकांची वाढ झाली, S&P 500 मध्ये 9.5% वाढ आणि Nasdaq मध्ये 12% पेक्षा अधिक उसळी नोंदवली गेली.
advertisement
भारतीय बाजारातही राहत रॅली?
कोटक एएमसी चे एमडी निलेश शाह यांनी सांगितले की, भारतीय बाजारातही एक ‘राहत रॅली’ पाहायला मिळू शकते. मात्र त्यांनी इशारा दिला की, ही रॅली केवळ एका बातमीवर टिकून राहील, असे मानणे योग्य ठरणार नाही. येत्या काळात बाजाराची नजर कंपन्यांचे कमाईचे निकाल आणि आर्थिक आकडेवारीवर असेल.
advertisement
कोणते सेक्टर तेजीत येणार?
प्राइम सिक्योरिटीज चे एन. जय कुमार यांच्या मते, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आज बाजारात गॅप-अप ओपनिंग दिसून येईल. विशेषतः मेटल्स, आयटी आणि चीन +1 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ऑटो आणि फार्मा क्षेत्रात काहीसा संयम बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतासाठी संधीचं क्षण
भारतानं या परिस्थितीचा फायदा घेत अमेरिकेसोबतची ‘फेज-1 ट्रेड डील’ पूर्ण करण्यावर भर देणं गरजेचं आहे. तसेच युरोपियन युनियन आणि युकेसह व्यापार करार अंतिम करण्याच्या हालचालीही वेगवान करणं आवश्यक ठरेल. चीनकडून होणारी डम्पिंग रोखण्यासाठी कठोर पावलं उचलणं आता काळाची गरज आहे.
advertisement
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
मराठी बातम्या/मनी/Share Market/
अमेरिकेच्या निर्णयामुळे शेअर मार्केटला येणार अच्छे दिन! 3 महिन्यात जे घडलं नाही ते आज होणार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement