टॅरिफ वॉरचा तडाखा! US Market कोसळलं, आता भारतीय बाजाराचं काय होणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमेरिकेच्या टैरिफ वॉरमुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता दीर्घकालीन फायदा लक्षात ठेवावा. शेअर बाजाराची ही अस्थिरता भविष्यात मोठ्या संधींचे दरवाजे उघडू शकते.
मुंबई: मागच्या पाच महिन्यांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये दाणादाण उडाली आहे. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. हे सगळं असताना आता अमेरिकेतून एक मोठी बातमी आली आणि भारतीय शेअर मार्केटचा मूड बदलण्याची चिन्हं आहेत. अमेरिकेत टॅरिफ वॉर सुरू झालं आहे. त्याचा परिणाम US मार्केटवर झाला असून शेअर्स आपटले आहेत. काही तासात अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं. तर दुसरीकडे भारतीय शेअर मार्केटवर आज त्याचा परिणाम दिसून येईल. कोणत्या सेक्टरला सगळ्यात जास्त फटका बसेल आणि कोणते स्टॉक सेफ राहातील याबाबत तज्ज्ञांनीच सांगितलं आहे.
अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचा मार्केटवर परिणाम
अमेरिकेच्या टैरिफ वॉरने जागतिक शेअर बाजारात खळबळ माजवली आहे. 4 मार्चपासून अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोच्या वस्तूंवर 25 टक्के ड्युटी तर चीनच्या वस्तूंवर 10 टक्के अतिरिक्त कर लागू केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून मेक्सिकोने देखील जवाबी शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. चीनने आधीच 10 मार्चपासून 15 टक्के अतिरिक्त कर लावणार असल्याचे सांगितले आहे.
advertisement
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देखील अमेरिकन वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. या टॅरिफ वॉरमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विक्रीला सुरुवात केली आहे. यामुळे Dow Jones Industrial Average तब्बल 432 पॉइंट्सने (1%) घसरला, तर S&P 500 आणि Nasdaq अनुक्रमे 0.9 टक्क्यांनी घसरले.
advertisement
टॅरिफ वॉरमुळे महागाईचा धोका
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यापार युद्धाचा सर्वात मोठा परिणाम अमेरिकेत महागाई वाढण्यावर होऊ शकतो. टॅरिफमुळे वस्तूंचे दर वाढतील आणि त्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कमी करण्याची शक्यता कमी होईल. भारतातील बाजारावर देखील याचा मोठा परिणाम होऊ शकतो. विदेशी गुंतवणूकदार अस्थिरतेच्या भीतीने भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात देखील मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
advertisement
कोणत्या शेअर्सना बसला मोठा फटका?
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, या घसरणीचा सर्वात मोठा फटका ऑटोमोबाईल कंपन्यांना बसला आहे. आज ऑटो सेक्टरच्या शेअर्सवर विशेष लक्ष राहणार आहे. General Motors आणि Ford कंपन्यांचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले. Chipotle Mexican Grill च्या शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले आहेत. (ही कंपनी मेक्सिकोमधून 50% एवाकाडो आयात करते.) टेक दिग्गज म्हणून मानली जाणारी कंपनी Nvidia चे शेअर्स 1% घसरले, तर दोन दिवसांत हे शेअर्स 9% घसरले आहेत. Tesla चे शेअर्स तब्बल 7% कोसळले आहेत.
advertisement
चीनमध्ये Tesla साठी नकार
चीनमध्ये Tesla ची विक्री कमी होत असल्याने हा परिणाम असावा अशी चर्चा सुरू झाली आहे. चीनच्या पॅसेंजर कार असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात टेस्लाच्या चीनमध्ये तयार झालेल्या कार्सच्या विक्रीत 50% घट झाली आहे. फक्त 30,000 युनिट्सची विक्री झाली असून हे गेल्या दोन वर्षांतील सर्वात कमी आकडे आहेत.
advertisement
कोणते सेक्टर होणार फायदा?
IT सेक्टर
Pharma कंपन्या
डेफेन्स सेक्टर
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
या व्यापार युद्धामुळे बाजारात पुढील काही दिवस अस्थिरता राहू शकते. गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटपासून दूर राहावे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करावे.
शेअर मार्केटचं भविष्य काय?
तज्ज्ञांच्या मते, ही घसरण काही काळासाठी असली तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरून शेअर्स विकू नयेत. उलट, दर्जेदार शेअर्समध्ये खरेदीची संधी मानली पाहिजे. ऑटो आयटी सेक्टर्समध्ये अगदी नवारुपाला आलेल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स या काळात अर्ध्या किंमतीत मिळत आहेत. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे. मात्र शॉर्ट किंवा मिड टर्मसाठी नाही तर लाँग टर्मसाठी ही गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 05, 2025 9:07 AM IST