Silver Price Today: 13 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं, चांदीचा नवा रेकॉर्ड, पुढच्या 4 महिन्यात कुठे असेल दर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Silver Price Today: आता चांदीची जागतिक मागणीपैकी 50% पेक्षा अधिक हिस्सा या ग्रीन इंडस्ट्रीतून येतो. चांदीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
Silver Price Today: चांदीचे दर 1772 रुपयांनी कोसळले आहेत. किलोमागे चांदीसाठी 1 लाख 4 हजार 445 रुपये मोजावे लागत आहेत. चांदीची होत असलेली दरवाढ पाहून जगभरातून भुवया उंचावल्या जात आहेत. मागच्या 48 तासांत चांदी 1 लाख 11 हजार रुपयांवर पोहोचली होती. आज सकाळी गुंतवणूकदारांना जेव्हा जागतिक बाजारात चांदीचा भाव पाहायला मिळाला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. चांदीने तब्बल 37.20 डॉ़लर प्रति औंसचा टप्पा गाठला होता.
2012 नंतर पहिल्यांदाच चांदी एवढ्या उंचीवर पोहोचली आहे. हा आकडा केवळ आकडा नाही, तर जागतिक अर्थकारण, तंत्रज्ञानाची प्रगती आणि राजकारणाच्या अनिश्चिततेचा आरसा आहे. चांदी ही फक्त गुंतवणूक किंवा दागिना नाही तर व्यावसायात सर्वात मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं साधन झालं आहे. सौरऊर्जा, इलेक्ट्रिक गाड्या, EV बॅटऱ्या आणि स्मार्ट डिव्हाइसेस हे सगळं हरित भविष्य चांदीशिवाय अशक्य होतं.
advertisement
आता चांदीची जागतिक मागणीपैकी 50% पेक्षा अधिक हिस्सा या ग्रीन इंडस्ट्रीतून येतो. चांदीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. 2025 हे सलग पाचवं वर्ष आहे जिथं चांदीचा पुरवठा मागणीपेक्षा कमी आहे. जरी टंचाई मागच्या वर्षीपेक्षा थोडी कमी असली, तरी बाजारात ‘मिळत नाही’ची भावना अधिक तीव्र झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि इराणमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. अशा वेळी गुंतवणूकदार अस्थिर मार्केटला पैसे लावण्याऐवजी सोने आणि चांदीकडे गुंतवणुकीसाठी वळत आहेत त्याचा सरळ परिणाम दरांवर पाहायला मिळतोय.
advertisement
विश्लेषककांच्या मते, चांदी आता फक्त भावनिक किंवा पारंपरिक गुंतवणूक नसून एक 'स्टॅटेजिक कमोडिटी' आहे. डॉलरची कमजोरी, बँकांचे व्याजदर, आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे चांदी खरेदी करण्याचा कल वाढला आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर पुढील काही महिन्यांत चांदीचा भाव 40 डॉलर प्रति औंस ओलांडेल, असंही भाकीत तज्ज्ञांनी केलं आहे. चांदीचे दर वाढत असल्याने लोक आता सिल्वर ETF सारख्या पर्यायाकडे लोक वळताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात सोन्यापेक्षा चांदीच जास्त फायदा मिळवून देईल असा तज्ज्ञांचा दावा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2025 12:54 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Silver Price Today: 13 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं, चांदीचा नवा रेकॉर्ड, पुढच्या 4 महिन्यात कुठे असेल दर


