Mutual Fund SIP: 5 हजार सोडा आता फक्त 500 रुपये गुंतवून तुम्ही होऊ शकता लखपती, कसं इथे वाचा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Mutual Fund SIP: पैसे बुडण्याच्या भीतीनं गुंतवणूकदार स्टॉक ऐवजी आता सोनं आणि म्युच्युअल फंडकडे वळताना दिसत आहे. म्युच्युअल फंडमध्ये शेअरच्या तुलनेत जास्त नफा मिळतो.
मुंबई: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन अनेकांना फसल्याची भावना येत आहे. मागच्या काही दिवसांपासून सलग मार्केट कोसळलं आहे. आज रिकव्हरी होईल असं वाटत असताना अस्थिरता कायम आहे. त्यामुळे सगळेच पैसे बुडण्याच्या भीतीनं गुंतवणूकदार स्टॉक ऐवजी आता सोनं आणि म्युच्युअल फंडकडे वळताना दिसत आहे. म्युच्युअल फंडमध्ये शेअरच्या तुलनेत जास्त नफा मिळतो. रिस्कही तितकीच जास्त असते. त्यामुळे शेअर सोडून आता म्युच्युअल फंडकडे गुंतवणूकदार वळत आहेत.
काही म्युच्युअल फंडमध्ये अगदी 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. तर काही फंडमध्ये 500, 1000, 5000 पासून सुरुवात करता येते. आज आपण छोटी गुंतवणूक मोठा नफा कसा मिळेल यासाठी 500 रुपयांची SIP काढली तर किती नफा मिळेल, कशी गुंतवणूक केली तर जास्त फायदा होईल ते समजून घेणार आहोत.
SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. छोटी गुंतवणूक सुरू करून मोठा नफा कमवण्यासाठी SIP हा एक चांगला पर्याय मानला जातो. फक्त 500 रुपयांपासून तुम्ही यात पैसे गुंतवू शकता. ही योजना कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीसाठीसुद्धा उपयुक्त आहे. गुंतवणुकीची कालावधी जितकी लांब असेल, तितका जास्त नफा मिळतो. 500 रुपये मासिक SIP गुंतवणुकीवर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांनंतर किती परतावा मिळू शकतो.
advertisement
500 रुपयांची SIP 5 वर्षांसाठी केली तर किती नफा मिळेल?
जर तुम्ही महिन्याला 500 रुपयांची SIP सुरू केली आणि ती 5 वर्षे चालवली, तर तुम्ही एकूण 30,000 रुपये गुंतवणूक कराल. सरासरी 12% वार्षिक रिटर्न्सनुसार तुम्हाला 11,243 रुपयांचा नफा मिळेल. 5 वर्षांनंतर तुमच्या हाती 41,243 रुपये येतील.
500 रुपयांची SIP 10 वर्षांसाठी केली तर किती नफा मिळेल?
advertisement
500 रुपये मासिक SIP सतत 10 वर्षे सुरू ठेवल्यास, एकूण गुंतवणूक 60,000 रुपये असेल. 12% परताव्याने तुम्हाला 56,170 रुपये नफा मिळेल, ज्यामुळे तुमच्याकडे 1,16,170 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील.
500 रुपयांची SIP 20 वर्षांसाठी केली तर किती नफा मिळेल?
advertisement
जर हीच SIP 20 वर्षे सुरू ठेवली, तर एकूण गुंतवणूक 1,20,000 रुपये होईल. 12% परताव्यामुळे तुम्हाला 3,79,574 रुपये नफा मिळेल. यामुळे 20 वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण 4,99,574 रुपये जमा होतील.
500 रुपयांची SIP 25 वर्षांसाठी केली तर किती नफा मिळेल?
25 वर्षांपर्यंत 500 रुपये मासिक SIP सुरू ठेवल्यास, तुम्ही एकूण 1,50,000 रुपये गुंतवाल. 12% वार्षिक परताव्यानुसार 7,98,818 रुपये नफा मिळेल. यामुळे तुमच्याकडे एकूण 9,48,818 रुपये होतील.
advertisement
500 रुपयांची SIP 30 वर्षांसाठी केली तर किती नफा मिळेल?
500 रुपये SIP 30 वर्षांसाठी ठेवली, तर तुमची गुंतवणूक फक्त 1,80,000 रुपये असेल. परंतु, 12% परताव्याने तुम्हाला 15,84,957 रुपये नफा मिळेल. त्यामुळे 30 वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण 17,64,957 रुपये असतील.
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12 टक्के हे सर्वसाधारण उदाहरण म्हणून गृहित धरलं आहे. ज्या कंपनीचे म्युच्युअल फंड तुम्ही घेता त्या कंपनीची ग्रोथ चांगली असेल तर तुम्हाला 15,19 अगदी 30 ते 35 टक्क्यांपर्यंतसुद्धा काहीवेळा रिटर्न मिळतो. जर कंपनीचे तिमाही अहवाल चांगले नसतील तर मात्र तिथे 10 टक्क्यांने देखील तुम्हाला पैसे मिळू शकतात. फंडमध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुमचे पैसे कुठे लागतात ते तुम्हाला दिसत नाहीत मात्र रिटर्न्स चांगले येतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ब्रोकर्सचे पैसेही यामध्ये असतात. त्यामुळे फंड्सची माहिती घेऊनच गुंतवणूक करा. अंदाजे, सोशल मीडियावर रिल्स पाहून केलेली गुंतवणूक धोक्याची ठरू शकते.
advertisement
डिस्क्लेमर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 28, 2025 11:05 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Mutual Fund SIP: 5 हजार सोडा आता फक्त 500 रुपये गुंतवून तुम्ही होऊ शकता लखपती, कसं इथे वाचा