उद्यापासून बाजारत मोठी उलथापालथ, गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी वाचा अपडेट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: उद्यापासून शेअर बाजारात मोठी उलथापालथ अपेक्षित आहे. महागाईचे आकडे, अमेरिकन आर्थिक डेटा, ट्रम्प टॅरिफ आणि एफआयआय-डिआयआयची हालचाल या पाच घटकांवर बाजाराची दिशा ठरणार आहे.
मुंबई: गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार जवळपास घसरणीसह बंद झाला. आता गुंतवणूकदारांचे लक्ष या आठवड्यातील 5 मोठ्या ट्रिगर्सवर लागले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीची दिशा ठरवण्यासाठी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs), देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DIIs) आणि जागतिक संकेतांची मोठी भूमिका असेल.
advertisement
गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 80,710.76 अंकांवर, तर निफ्टी 24,741 अंकांवर बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.10% ने घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.09% ने वाढला. तज्ज्ञांनुसार 8 सप्टेंबरपासून शेअर बाजारावर कोणत्या घटकांचा परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया.
advertisement
1. महागाईचे आकडे (Inflation Data):
12 सप्टेंबर रोजी ऑगस्ट 2025 साठीचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) जाहीर होईल. हा आकडा थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) व्याजदर धोरणावर आणि बाजाराच्या भावनांवर परिणाम करेल. रेलिगेयर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी (रिसर्च) अजित मिश्रा यांनी सांगितले की- येणारा आठवडा देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील आर्थिक आकडेवारीसाठी महत्त्वाचा असेल. मिंटच्या मते, देशांतर्गत आघाडीवर ऑगस्ट (12 सप्टेंबर) च्या महागाईच्या आकडेवारीवर, बँक कर्ज, ठेव वाढ (डिपॉझिट ग्रोथ) आणि परकीय चलन साठ्यावर (फॉरेक्स रिझर्व) बारकाईने लक्ष दिले जाईल. विशेषतः बँकांच्या अलीकडील कमकुवत कामगिरीच्या पार्श्वभूमीवर.
advertisement
2. अमेरिकेचे आर्थिक डेटा (US Data Releases):
या आठवड्यात अमेरिकेतून सीपीआय, पीपीआय, बेरोजगारीचे दावे (जॉबलेस क्लेम्स) आणि ग्राहक भावना (कंझ्युमर सेंटिमेंट) यांसारखे महत्त्वाचे आकडे येतील. यातून फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयांचे संकेत मिळतील आणि परदेशी भांडवलाच्या प्रवाहावर परिणाम होईल.
advertisement
3. ट्रम्प टॅरिफ (Trump Tariff):
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन कार्यकारी आदेश (एक्झिक्युटिव्ह ऑर्डर) जारी केला आहे. जर व्यापार भागीदार सहमत झाले. तर धातू, फार्मा आणि रसायने (केमिकल्स) यांसारख्या 45 श्रेणींवर शून्य आयात शुल्क (इम्पोर्ट ड्युटी) लागेल. याचा भारतावर अप्रत्यक्ष परिणाम दिसू शकतो.
advertisement
4. परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदार (FIIs & DIIs):
गेल्या शुक्रवारी FIIs ने 1,305 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर DIIs ने 1,821 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. 2025 मध्ये आतापर्यंत FIIs 2.15 लाख कोटी रुपयांचे निव्वळ विक्रेते (नेट सेलर) आहेत. तर DIIs ने 5.24 लाख कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
advertisement
5. बँकिंग आणि फॉरेक्स डेटा:
क्रेडिट-डिपॉझिट ग्रोथ आणि फॉरेक्स रिझर्व्हचे आकडेही बाजाराची दिशा ठरवतील. अलीकडे बँकांची कामगिरी अपेक्षेनुसार नसल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष या क्षेत्राकडे असेल.
Disclaimer: वरील माहिती तज्ञांनी व्यक्त केलेले विचार आणि गुंतवणूक टिप्स त्यांचे स्वतःचे आहेत. वेबसाइट किंवा तिच्या व्यवस्थापनाचे नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक तोट्यासाठी News18 जबाबदार असणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 6:19 PM IST
मराठी बातम्या/मनी/
उद्यापासून बाजारत मोठी उलथापालथ, गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी वाचा अपडेट