Stocks to Buy: शेअर बाजारातील Inside यादी, 80% रिटर्न Share नाव उघड; वेड्यांसारखी खरेदी सुरू, पाहताच पाहता पोर्टफोलिओ होईल दुप्पट

Last Updated:

Share Market Prediction मार्केटमध्ये अशी एक एन्ट्री पॉईंट आली आहे जी प्रत्येक गुंतवणूकदारासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकते. तज्ञ म्हणतात, ही संधी चुकवली तर पुढे फक्त पश्चात्ताप उरणार.

News18
News18
मुंबई: शेअर बाजारातील विविध कंपन्यांचे निकाल जाहीर होण्याचं सत्र सुरूच आहे आणि त्यासोबतच ब्रोकरेज हाऊस आणि विश्लेषकांकडून कंपन्यांच्या कामगिरीवर आणि शेअरच्या मूल्यमापनावर पुनरावलोकन व सल्ल्यांचा वर्षाव होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी अनेक मोठ्या शेअर्ससाठी गुंतवणुकीचे सल्ले जाहीर झाले आहेत. यामध्ये एनटीपीसी, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एलआयसी हाउसिंग फायनान्स, महानगर गॅस, अदाणी पॉवर आणि नवीन फ्लोरीन या कंपन्यांचा समावेश आहे.
advertisement
यापैकी एका शेअरमध्ये ‘होल्ड’ करण्याची तर उर्वरित शेअर्समध्ये नवीन गुंतवणुकीची शिफारस करण्यात आली आहे. या शेअर्समधून 14 ते 30 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र ICICI Securities ने Swiggy बद्दलच्या आपल्या अहवालात या सर्वांपेक्षा अनेक पटींनी जास्त म्हणजे 80 टक्क्यांपर्यंतचा बंपर रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.
advertisement
Swiggy वर ICICI Securities चा अहवाल
ICICI Securities ने आपल्या ताज्या विश्लेषणात Swiggy या स्टॉकवर खरेदीची शिफारस (Buy rating) कायम ठेवली आहे. रिपोर्टनुसार कंपनीने 740 चे लक्ष्यभाव (Target Price) ठरवले असून सध्या हा शेअर सुमारे 410 वर ट्रेड होत आहे. म्हणजेच, येथून पुढे या स्टॉकमध्ये 80 टक्क्यांहून अधिक वाढीची क्षमता असल्याचं ब्रोकरेजनं म्हटलं आहे.
advertisement
रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, दुसऱ्या तिमाहीचे निकाल अनेक सकारात्मक संकेत देतात. फूड डिलिव्हरी बिझनेस विभागात Gross Order Value (GOV) आणि Adjusted Revenue या दोन्हींत वाढ झाली असून, स्पर्धा वाढूनही Swiggy ने आपला मार्केट शेअर मजबूत केला आहे. तसेच क्विक कॉमर्स (QC) म्हणजेच Instamart सारख्या व्यवसायांमध्येही GOV मध्ये वाढ झाली आहे. यावरून स्पष्ट होतं की, कंपनीच्या ऑर्डर्सच्या संख्येत आणि सरासरी ऑर्डर व्हॅल्यूमध्ये (AOV) दोन्हीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे.
advertisement
प्रत्येक स्टोअरमधील रोजच्या ऑर्डर्समध्ये 4.1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, यामुळे स्टोअर एफिशियन्सीमध्ये सुधारणा झाल्याचं दिसतं. एकंदरीत पाहता, Swiggy ची क्विक कॉमर्स युनिट मजबूत कामगिरी करत आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास आणखी वाढणार आहे.
इतर शेअर्सवरील गुंतवणुकीच्या शिफारसी
ICICI Direct ने NTPC साठी 439 चं लक्ष्य ठरवत गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
advertisement
Transport Corporation of India साठी 1500 चं लक्ष्य जाहीर केलं आहे.
Mahanagar Gas साठी 1525 चं लक्ष्य दिलं असून गुंतवणुकीची शिफारस केली आहे.
Adani Power साठी 187 चं लक्ष्य निश्चित केलं आहे.
तर Prabhudas Lilladher या ब्रोकरेजनं LIC Housing Finance वर ‘Hold’ म्हणजेच सध्याची पोझिशन कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
नोव्हेंबरच्या सुरुवातीस गुंतवणूकदारांसाठी ही विश्लेषकांचा हा सल्ला महत्त्वाची ठरणार आहे. कारण अनेक शेअर्समध्ये दुहेरी आकड्यांतील परतावा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि Swiggy यात सर्वाधिक आकर्षक पर्याय म्हणून समोर आले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Stocks to Buy: शेअर बाजारातील Inside यादी, 80% रिटर्न Share नाव उघड; वेड्यांसारखी खरेदी सुरू, पाहताच पाहता पोर्टफोलिओ होईल दुप्पट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement