Business Ideas : 8 रुपयांपासून नेल आर्ट, व्यवसाय करण्यासाठी बेस्ट ऑप्शन, मुंबईत इथं करा खरेदी

Last Updated:

स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या तरुणींसाठी नेल आर्ट हा आजच्या काळातील एक लोकप्रिय पर्याय ठरत आहे.

+
फक्त

फक्त पंधराशे रुपयांत नेल आर्ट व्यवसायाची सुरुवात; क्रॉफर्ड मार्केटमध्ये स्वस्त साहित्य उपलब्ध

मुंबई: स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या तरुणींसाठी नेल आर्ट हा आजच्या काळातील एक लोकप्रिय पर्याय ठरत आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसून फक्त पंधराशे रुपयांत नेल आर्टचा व्यवसाय सुरू करता येतो. यासाठी मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट हे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या बाजारात नेल आर्टसाठी लागणारे साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध आहे.
क्रॉफर्ड मार्केटमधील बोल्ड बी या दुकानात नेल आर्टसाठी लागणारे साहित्य अगदी 8 रुपयांपासून मिळते. नेल आर्ट काढण्यासाठी लागणारे ग्लिटर पावडर, नेल स्टिकर्स, छोटे स्टोन्स आणि बिंदी यांची सुरुवात 8 रुपयांपासून होते. त्यामुळे कमी पैशात वेगवेगळ्या डिझाईनसाठी आवश्यक साहित्य सहज खरेदी करता येते.
advertisement
नेल आर्ट डिझाईन तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली डॉटिंग टूल्स, नेल आर्ट ब्रश आणि लाइनर ब्रश ही साधने देखील येथे स्वस्त दरात उपलब्ध आहेत. साधे डॉटिंग टूल 10 ते 15 रुपयांपासून, तर नेल आर्टसाठी वापरले जाणारे ब्रश आणि लाइनर ब्रश 15 रुपयांपासून उपलब्ध आहेत. याचबरोबर थोडे जाड आणि चांगल्या क्वालिटीचे ब्रश 20 ते 50 रुपयांपासून मिळतात, जे फुलांचे, लाईन वर्क आणि फाईन डिझाईनसाठी उपयोगी पडतात.
advertisement
नेल आर्ट टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले बेस कोट आणि टॉप कोट देखील येथे कमी दरात मिळतात. साधा बेस कोट किंवा टॉप कोट 50 रुपयांपासून उपलब्ध असून, यामुळे नेल आर्ट अधिक आकर्षक दिसते आणि जास्त काळ टिकते. याशिवाय नखे कापण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नेल क्लिपर, क्युटिकल पुशर आणि क्युटिकल कटर ही साधने 20 ते 50 रुपयांपासून मिळतात.
advertisement
ग्राहकांसाठी स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने कॉटन, कागदी वाइप्स आणि नेल क्लिनिंग साहित्य देखील येथे कमी किमतीत उपलब्ध आहे. हे सर्व साहित्य एकत्र केल्यास पंधराशे रुपयांच्या आत संपूर्ण नेल आर्ट किट तयार करता येते, ज्याच्या मदतीने व्यवसायाची सुरुवात करता येते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Business Ideas : 8 रुपयांपासून नेल आर्ट, व्यवसाय करण्यासाठी बेस्ट ऑप्शन, मुंबईत इथं करा खरेदी
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement