भारताचे नशीब बदललं, सापडला जगातील सगळ्यात मोठा तेलसाठा; एका झटक्यात इंडिया थेट टॉपला, GDPच्या वेगाने चीन हादरला

Last Updated:

India Find Crude Reserve: अंदमानच्या समुद्रात भारताला कच्च्या तेलाचा प्रचंड साठा सापडला आहे. जो अर्थव्यवस्थेच्या भविष्याला पूर्णतः बदलू शकतो. सरकारच्या मते, या तेलखजिन्यामुळे भारताची जीडीपी थेट 20 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते.

News18
News18
नवी दिल्ली: सध्या भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पण अद्याप हे लक्ष्य गाठले गेलेले नाही. विविध अंदाजांनुसार, या स्तरावर पोहोचण्यासाठी अजून काही वर्षे लागतील. मात्र आता अशी एक बातमी समोर आली आहे, जी भारताचे भवितव्यच बदलू शकते. भारताची अर्थव्यवस्था फक्त 5 नव्हे तर थेट 20 ट्रिलियन डॉलरपर्यंत जाऊ शकते आणि हे साध्य होण्यासाठी फारसा वेळही लागणार नाही. याची संपूर्ण माहिती सरकारनेच दिली आहे. सरकारने सांगितले की, अंदमानच्या खोल समुद्रात हा खजिना सापडला आहे आणि तो मिळवण्यासाठी संशोधनासह समुद्राच्या तळातून त्याचे उत्खनन करण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, अंदमानच्या समुद्रात कच्च्या तेल आणि गॅसचा मोठा साठा सापडला आहे. असा अंदाज आहे की, हा साठा मिळाल्यानंतर भारताच्या उर्जेच्या गरजा एका झटक्यात पूर्ण होतील. त्यांनी सांगितले की, अलीकडेच गुयाना देशात मिळालेल्या कच्च्या तेलाच्या साठ्याइतकाच हा साठा असल्याचे दिसत आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर भारताचे जीडीपीचे आकारमान एका झटक्यात जवळपास 5 पट वाढू शकते.
advertisement
85 टक्के तेलाची आयात करतो
भारतासाठी कच्च्या तेलाचा हा साठा किती महत्त्वाचा आहे. हे यावरून लक्षात येईल की सध्या आपण आपल्या गरजेपैकी 85 ते 86 टक्के कच्चे तेल परदेशातून मागवतो. भारत सध्या 42 देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो. मात्र सध्या सुरू असलेल्या इराण-इस्त्रायल युद्धाचा यावर मोठा परिणाम होऊ शकतो. भारत आपल्या एकूण आयातीपैकी सुमारे 46 टक्के तेल मध्यपूर्वेतून मागवतो आणि या दोन्ही देशांमधील तणावामुळे तेल महाग होण्याची शक्यता आहे. परिणामी भारताच्या 8 लाख कोटी रुपयांच्या तेल आयात बिलावर याचा थेट परिणाम होऊ शकतो.
advertisement
किती मोठा आहे हा साठा?
केंद्रीय मंत्र्यांच्या मते, अंदमानच्या समुद्रात मिळालेला हा द्रव सोन्यासारखा साठा अलीकडे गुयानामध्ये सापडलेल्या तेलसाठ्याइतकाच आहे. गुयानामध्ये अलीकडे 11.6 अब्ज बॅरल कच्च्या तेल आणि गॅसचा साठा सापडला आहे. जो चीनच्या कंपनीच्या सहकार्याने शोधण्यात आला. या साठ्यामुळे गुयाना कच्च्या तेलाच्या उत्पादनात अग्रक्रमावर पोहोचू शकतो. जो सध्या 17व्या क्रमांकावर आहे. असा अंदाज आहे की भारताचा साठाही जवळपास 12 अब्ज बॅरल इतका असू शकतो.
advertisement
भारताला होणारा फायदा
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, जर हा साठा आपल्या अंदाजानुसारच आहे आणि तो काढण्यात यश आले. तर केवळ भारताच्या उर्जेच्या गरजाच पूर्ण होणार नाहीत, तर अर्थव्यवस्थेलाही मोठा चालना मिळेल. सध्या भारताची जीडीपी सुमारे 3.7 ट्रिलियन डॉलर आहे. जी या तेलसाठ्यामुळे 20 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. सध्या या साठ्याच्या संशोधन आणि उत्खनन पद्धतींवर काम सुरू आहे आणि जर तो मिळाला, तर दीर्घकालीन अर्थिक फायदा निश्चित आहे.
advertisement
सध्या कुठून काढले जाते तेल
अंदमानच्या तेलसाठ्याच्या आधी भारतात अनेक ठिकाणी कच्च्या तेलाचे उत्खनन केले जाते. सध्या भारत असम, गुजरात, राजस्थान, मुंबई आणि कृष्णा-गोदावरी बेसिन येथून कच्चे तेल काढतो. कच्च्या तेलाच्या साठ्यांसोबतच भारताने रिफाइन्ड तेलाचेही मोठे साठे तयार केले आहेत. हे साठे विशाखापट्टणम, मंगळूर आणि पुदूर येथे आहेत. याशिवाय ओडिशा आणि राजस्थानमध्येही तेल साठवणुकीसाठी व्यवस्था तयार केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
भारताचे नशीब बदललं, सापडला जगातील सगळ्यात मोठा तेलसाठा; एका झटक्यात इंडिया थेट टॉपला, GDPच्या वेगाने चीन हादरला
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement