Anant Ambani:अनंत अंबानी यांना वन्यजीव संवर्धनातील नेतृत्वासाठी 'ग्लोबल ह्युमॅनिटेरियन' पुरस्कार प्रदान

Last Updated:

वन्यजीव संवर्धनातील योगदानाबद्दल अनंत अंबानी यांचा गौरव करण्यात आला असून हा पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण आणि पहिले आशियाई नागरिक ठरले आहेत.

News18
News18
मुंबई:  अमेरिकेतील सर्वात जुन्या राष्ट्रीय प्राणी कल्याण संस्थेची आंतरराष्ट्रीय शाखा असलेल्या 'ग्लोबल ह्युमेन सोसायटीने' 'वनतारा' (Vantara)  वन्यजीव रेस्क्यू सेंटरचे संस्थापक अनंत अंबानी यांना प्रतिष्ठित 'ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड फॉर ॲनिमल वेल्फेअर' देऊन गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त करणारे अनंत अंबानी हे जगातील सर्वात तरुण व्यक्ती तसंच पहिले आशियाई नागरिक ठरले आहेत.
वन्यजीव संरक्षण आणि प्राणी कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. प्राणी कल्याण आणि संवर्धनाच्या क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक सन्मानांपैकी हा एक असून, पुरावा-आधारित कल्याणकारी कार्यक्रम, विज्ञान-आधारित संवर्धन उपक्रम आणि जगभरातील दुर्बळ प्रजातींच्या संरक्षणासाठी अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला आहे.
advertisement
'ग्लोबल ह्युमेन सोसायटीने' 'वनतारा' या रेस्क्यू केंद्राची स्थापना करण्यातील त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वासाठी  अंबानी यांची निवड केली. मोठ्या प्रमाणावर प्राणी बचाव, पुनर्वसन आणि प्रजातींचे संरक्षण या क्षेत्रात काय साध्य करता येते, याची व्याख्या 'वनतारा' केंद्राने बदलून टाकली आहे.
पुरस्कार स्वीकारताना अनंत अंबानी यांनी 'ग्लोबल ह्युमेन सोसायटी'चे आभार मानले. ते म्हणाले, "माझ्यासाठी, हा सन्मान 'सर्व भूत हित' (सर्व जीवांचे कल्याण) या कालातीत तत्त्वाची पुष्टी करतो. प्राणी आपल्याला संतुलन, नम्रता आणि विश्वास शिकवतात. 'सेवा' (Seva) या भावनेने प्रेरित होऊन, प्रत्येक जीवाला सन्मान, काळजी आणि आशा देणे हा 'वनतारा'चा उद्देश आहे. संवर्धन हे उद्यासाठी नाही; तर तो एक सामायिक धर्म आहे जो आपण आज जपला पाहिजे." असं यावेळी अनंत अंबानी म्हणाले.
advertisement
तर, या संस्थेच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रॉबिन गॅन्झर्ट यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, "वंताराला 'ग्लोबल ह्युमेन सर्टिफाइड' दर्जा मिळणे हे केवळ उत्कृष्ट काळजी दर्शवत नाही, तर प्रत्येक प्राण्याला सन्मान, उपचार आणि आशा देण्याची त्यांची  बांधिलकी दर्शवते. 'वनतारा' हे प्राणी कल्याणासाठी केलेलं जगातील सर्वात मोठं आणि असाधारण कार्य आहे. हे केंद्र केवळ एक बचाव केंद्र नसून, ते उपचारांचे अभयारण्य आहे."  अंबानी यांच्या नेतृत्वाने सहानुभूती आणि कृतीचा एक नवा जागतिक मापदंड निश्चित केला आहे.
advertisement
दिग्गजांच्या यादीत समावेश
गेल्या काही वर्षांत, 'ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड' हा फक्त काही निवडक दूरदर्शी व्यक्तींनाच देण्यात आला आहे, ज्यांनी आपल्या नेतृत्वाने पशु कल्याणाची दिशा बदलली आहे. यापूर्वी सन्मानित झालेल्यांमध्ये शर्ली मॅकलेन, जॉन वेन आणि बेटी व्हाईट यांसारख्या हॉलीवूडमधील दिग्गजांचा समावेश आहे. तसेच, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि बिल क्लिंटन यांच्यासारख्या प्रमुख राजकीय नेत्यांनाही हा सन्मान मिळाला आहे.
advertisement
कठोर ऑडिटनंतर 'वनतारा'ला मिळाली मान्यता
'ग्लोबल ह्युमेन सर्टिफाइड' कार्यक्रम हे जगातील पशु कल्याणासाठी सर्वात कठोर आणि महत्त्वपूर्ण प्रमाणांपैकी एक आहे. हा दर्जा मिळवण्यासाठी 'वँतारा'ने पशु कल्याण, वर्तणूक विज्ञान, पशुवैद्यकीय औषधशास्त्र आणि नीतिमत्ता या क्षेत्रांतील जागतिक स्तरावरील तज्ञांनी केलेल्या एका व्यापक आणि स्वतंत्र तपासणीला (ऑडिट) पूर्ण केले. 'वनतारा'ची खासियत ही आहे की, ते 'एक्स सीटू' (प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर केलेली काळजी) आणि 'इन सीटू' (नैसर्गिक परिसंस्थेतील संरक्षण) यांचा समन्वय साधते, ज्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी एक दीर्घकालीन, विज्ञान-आधारित मार्ग तयार होतो. या समारंभात जागतिक वन्यजीव संवर्धनातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या, ज्यात आययूसीएन (IUCN) चे माजी अध्यक्ष डॉ. जॉन पॉल रोड्रिग्ज, कोलोसल बायोसायन्सेसचे मॅट जेम्स आणि अनेक प्रमुख अमेरिकन प्राणिसंग्रहालयांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांचा समावेश होता. याशिवाय, डॉ. नीलम खैरे, डॉ. व्ही.बी. प्रकाश आणि डॉ. के.के. सरमा यांसारखे प्रसिद्ध भारतीय संवर्धन तज्ज्ञही उपस्थित होते, ज्यांचे भारतातील वन्यजीव संशोधनात महत्त्वाचे योगदान आहे.
advertisement
'ग्लोबल ह्युमेन सोसायटी': अमेरिकेची सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित संस्था
'ग्लोबल ह्युमेन सोसायटी' हा 'अमेरिकन ह्युमेन सोसायटी'चा आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे, जी अमेरिकेतील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. गेल्या सुमारे १५० वर्षांपासून ही संस्था पशु कल्याण क्षेत्रात 'वैज्ञानिक पालक' म्हणून काम करत आहे. ही जगातील सर्वात मोठी पशु कल्याण प्रमाणन संस्था आहे, जी दरवर्षी ५९ देशांमध्ये १.५ अब्जाहून अधिक प्राण्यांची सुरक्षा आणि त्यांच्यासोबत मानवीय व्यवहार सुनिश्चित करते. संस्थेच्या अध्यक्षा आणि सीईओ डॉ. रॉबिन गॅन्झर्ट आहेत. या संस्थेच्या ऐतिहासिक प्रतिष्ठेवरून हे लक्षात येते की अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष या संस्थेशी जोडलेले राहिले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांना त्यांच्या संवर्धन आणि मानवतावादी कार्याबद्दल या संस्थेने सन्मानित केले आहे, तर विल्यम हॉवर्ड टॅफ्ट हे संस्थेचे पदाधिकारीही राहिलेले आहेत. ही संस्था पहिल्या महायुद्धाच्या रणांगणांपासून ते आधुनिक हवामान बदलापर्यंत, मुख प्राण्यांचा आवाज बनून काम करत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Anant Ambani:अनंत अंबानी यांना वन्यजीव संवर्धनातील नेतृत्वासाठी 'ग्लोबल ह्युमॅनिटेरियन' पुरस्कार प्रदान
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement