Bank Loan : वेळेपूर्वी लोन भरल्यावर प्रत्येकाला फ्लोरक्लोजर चार्ज द्यावा लागतो का? काय सांगतो नियम
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
फोरक्लोजरचा ऑप्शन पर्सनल लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस, टू-व्हीलर किंवा कार लोन यासाठी मिळतो. पण खास गोष्ट म्हणजे प्रत्येकालाच हे फोरक्लोजर चार्ज भरावे लागत नाहीत.
नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात बँक कर्ज हे ओझं मानलं जात होतं. पण, आता मात्र ती सुविधा मानली जात आहे. आता खातेदार त्यांच्या छोट्या-छोट्या गरजांसाठी बँकांकडून कर्ज घेतात आणि त्याचे ईएमआय भरतात. बँकेकडून बरीच कर्ज दिली जातात, त्या पैकी वैयक्तीक कर्ज, कार कर्ज यांसारखी कर्ज कमी कालावधीसाठी असतात, पण गृह कर्ज जास्त काळासाठी असतं. बँकेकडून घेतलेलं कर्ज तुम्ही हप्त्यांमध्ये परत करू शकता. बरेच लोक कर्जाच्या ठराविक मुदतीपूर्वीच संपूर्ण कर्जाची परतफेड करतात. कर्ज मुदतीपूर्वी फेडून ती प्रक्रिया बंद करण्याला बँकिंगच्या भाषेत लोन फोरक्लोजर म्हणतात.
फोरक्लोजरमध्ये कर्ज घेणारी व्यक्ती संपूर्ण थकीत कर्जाची रक्कम एकाच वेळी भरते. वेळेपूर्वी कर्जाची परतफेड करण्याचा तुमचा हेतू असेल, तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. सर्वात आधी हे लक्षात ठेवा की कर्जाचे काही ईएमआय भरल्यानंतरच तुम्हाला ही सुविधा मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फोरक्लोजर करताना शुल्कदेखील भरावे लागेल.
फोरक्लोजर चार्ज कोणाला भरावे लागत नाही
फोरक्लोजरचा ऑप्शन पर्सनल लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस, टू-व्हीलर किंवा कार लोन यासाठी मिळतो. पण खास गोष्ट म्हणजे प्रत्येकालाच हे फोरक्लोजर चार्ज भरावे लागत नाहीत. भारतीय रिझर्व बँकेच्या नियमांनुसार जर तुम्ही कर्ज फ्लोटिंग इंटरेस्टवर घेतलं असेल आणि आता मुदतीआधी कर्ज फेडत असाल तर तुम्हाला फोरक्लोजर चार्ज भरावे लागणार नाहीत. फोरक्लोजर चार्ज फिक्स्ड इंटरेस्टवर घेतलेल्या कर्जला मुदतीआधी बंद करण्यासाठी घेतला जातो.
advertisement
प्रत्येक बँकेचे फोरक्लोजर चार्जेस वेगवेगळे असतात. फोरक्लोजरमुळे बँकेचे नुकसान होते, म्हणून ते चार्जेस आकारतात. तुम्ही मुदतीपूर्वी कर्ज फेडल्यास तुमच्यावरील फोरक्लोजर चार्ज साधारणपणे थकित रकमेवर पाच टक्क्यांपर्यंत असतो. हे शुल्क तुमच्या कर्ज अॅग्रीमेंटमध्ये लिहिलेलं असतं. कर्ज घेण्यापूर्वी त्यात याचा उल्लेख आहे की नाही ते तपासा.
वेळेआधी कर्ज फेडण्याचे फायदे
वेळेआधी कर्ज फेडण्याचे अनेक फायदे आहेत. व्याज म्हणून कमी पैसे द्यावे लागतात. डोक्यावर कर्ज नसल्यामुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या चिंतेत राहत नाही. वेळेपूर्वी कर्जाची परतफेड केल्याने क्रेडिट स्कोअर देखील मजबूत होतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 09, 2024 1:15 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Bank Loan : वेळेपूर्वी लोन भरल्यावर प्रत्येकाला फ्लोरक्लोजर चार्ज द्यावा लागतो का? काय सांगतो नियम







