Types of Cheque: पोस्ट डेटेड, स्टेल आणि अँट डेटेड चेक म्हणजे काय? चेक जमा करण्यापूर्वी अवश्य घ्या जाणून

Last Updated:

पोस्ट डेटेड, स्टेल आणि अँट डेटेड चेकची माहिती ते जारी केलेल्या तारखेवरुन मिळते. प्रत्येक व्यक्तीला यासंबंधीत गोष्टी माहिती असायला हव्यात. जेणेकरुन बँकेत पैसे भरताना कोणतीही अडचण येऊ नये.

चेकचे प्रकार
चेकचे प्रकार
मुंबई, 8 ऑगस्ट: पोस्ट डेटेड, स्टेल आणि अँट डेटेड चेकची माहिती ते जारी केलेल्या तारखेवरुन मिळते. प्रत्येक व्यक्तीला यासंबंधीत गोष्टी माहिती असायला हव्यात. जेणेकरुन बँकेत पैसे भरताना कोणतीही अडचण येऊ नये. देशात लाखो लोक पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी चेकचा वापर करतात. यासाठी हे माध्यम पैसे भरण्यासाठी प्रचलित आहे. मात्र चेकने पेमेंट करताना काही सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. अनेकदा लोक चेक आणि त्याद्वारे पेमेंटच्या पद्धतींविषयी कंफ्यूज राहतात.
बँक चेकचे अनेक प्रकार आहेत आणि ते वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. तुम्ही कधी स्टेल आणि पोस्ट डेटेड चेकबद्दल ऐकले आहे का? अनेकदा लोकांमध्ये या दोन चेकमधील फरकाबाबत काही कंफ्यूजन असते. याविषयीच आज आपण जाणून घेऊया.
Post Dated Cheque
पोस्ट-डेटेड चेक म्हणजे असे चेक जे काही दिवसांनी एका तारखेसाठी जारी केले जातात. हा क्रॉस्ड पेई किंवा अकाउंट पेई चेक आहे. चेकची तारीख कोणतीही असो, तो त्या तारखेपासून पुढील 3 महिन्यांसाठी मान्य असतो.
advertisement
जेव्हा चेक जारी करताना तुमच्याकडे पुरेसा फंड उपलब्ध नसतो तेव्हा पोस्ट-डेटेड चेक सर्वोत्तम असतात. परंतु तुमच्याकडे चेकवर निर्दिष्ट केलेल्या तारखेला किंवा अंतिम मुदतीवर फंड असेल याची खात्री असते.
Stale Cheque
स्टेल चेक हे असे चेक आहेत जे जारी केल्याच्या तारखेपासून पुढील 3 महिन्यांसाठी भरले जात नाहीत. अशा स्थितीत त्यांची मुदत संपते. जेव्हा एखादी व्यक्ती मुदत संपल्यानंतर पैसे भरण्यासाठी बँकेला चेक देते, तेव्हा बँक त्याचे पैसे देत नाही. कालबाह्य झालेल्या चेकला स्टेल चेक म्हणतात.
advertisement
Ante-dated Cheque
अँटी-डेटेड चेक, जो पोस्ट-डेटेड तारखेला जारी केला जातो. जर अशा चेकची 3 महिन्यांची व्हॅलिडिटी शिल्लक असेल, तर तो पेमेंटसाठी बँकेत दिला जाऊ शकतो. लक्षात ठेवा की अँटी डेटेड चेक एवढ्या जुन्या तारखेला जारी केला जाऊ नये की, तो यापुढे व्हॅलिड राहणार नाही. कारण चेक सामान्यतः जारी झाल्यानंतर 3 महिन्यांसाठी वैध असतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Types of Cheque: पोस्ट डेटेड, स्टेल आणि अँट डेटेड चेक म्हणजे काय? चेक जमा करण्यापूर्वी अवश्य घ्या जाणून
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement