उत्पन्नाचा दाखला, ITR नाही, तरीही सिडको लॉटरीसाठी अर्ज करता येणार, काय आहे नियम?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सिडकोच्या लॉटरीसाठी अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला अनिवार्य नाही, पण घराचा ताबा मिळेपर्यंत तो सादर करावा लागतो; ITR, फॉर्म १६, सॅलरी स्लिप पर्याय आहेत.
मुंबई: सिडकोच्या लॉटरीसाठी तुम्ही अर्ज करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं की तुम्ही सिडकोला घर खरेदी करताना काही कागदपत्र खूप महत्त्वाची आवश्यक असतत. ती तुमच्याकडे नसतील तर तुमच्या हातातून लागलेलं घर जाण्याची शक्यता आहे. सिडकोच्या लॉटरीमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला किंवा ITR सादर करावा लागतो. मात्र या दोन्ही गोष्टी नसतील तर?
तुम्ही घरापासून दूर राहता त्यामुळे आता उत्पन्नाचा दाखला काढणं शक्य नाही. १२ लाखांपर्यंत तसाही कर भरायचा नाही त्यामुळे Null आयटीआरही फाइल करण्यासाठी आळस केला. तर मग संकटात सापडल्यासारखं वाटतं, अर्ज तर भरायचा आहे ह्या दोन्ही गोष्टी तर नाहीत, मग कसं बरं करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. सिडकोनं आपल्या वेबसाइटवर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्याची इच्छा आहे, पण हातात उत्पन्नाचा दाखला नाही, अशा विवंचनेत अनेक अर्जदार असतात. मात्र, सिडकोच्या नियमानुसार अर्ज भरतानाच उत्पन्नाचा दाखला असणे अनिवार्य नाही. पण, घराचा ताबा मिळेपर्यंत मात्र तो सादर करावाच लागतो.
advertisement
अर्ज करताना काय करावे?
जेव्हा तुम्ही सिडकोच्या वेबसाईटवर नोंदणी करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती भरावी लागते. यावेळेस तुम्ही तुमच्या अंदाजित उत्पन्नानुसार (जी कॅटेगरी तुम्हाला हवी आहे) माहिती भरू शकता. अर्ज करताना दाखला अपलोड करण्याची सक्ती नसते, फक्त उत्पन्नाचा आकडा भरावा लागतो.
दाखला कधी लागतो?
जर लॉटरीमध्ये तुमचे नाव आले (तुम्ही विजेता ठरलात तर), त्यानंतर सिडकोकडून कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू होते. या टप्प्यावर तुम्हाला सक्षम प्राधिकाऱ्याने (तहसीलदार कार्यालय) दिलेला अधिकृत उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. जर त्यावेळी तुमच्याकडे दाखला नसेल किंवा त्यातील उत्पन्न तुम्ही अर्जात भरलेल्या माहितीपेक्षा जास्त असेल, तर तुमचं घर रद्द होऊ शकतं.
advertisement
दाखला नसताना 'हे' पर्याय वापरा
आयकर परतावा : जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल, तर मागील ३ वर्षांचे ITR उत्पन्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात. उत्पन्नाचा दाखला मिळायला साधारण ७ ते १५ दिवस लागतात. जर लॉटरीची मुदत अजून बाकी असेल, तर आजच महा-ई-सेवा केंद्रात जाऊन दाखल्यासाठी अर्ज करा. यापेक्षाही आणखी एक वेगळं खासगी नोकरीत असाल तर फॉर्म १६ किंवा 12 महिन्यांच्या सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट काढून ठेवा, त्याच्या आधारे तुम्ही तहसीलदार कार्यालयातून दाखला मिळवू शकता. त्या स्लीप तुम्ही अर्ज भरण्यासाठी देखील जोडू शकता.
advertisement
उत्पन्नाची मर्यादा लक्षात ठेवा:
EWS: वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत.
LIG : वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख रुपयांपर्यंत हे प्रत्येक स्कीमुसार बदलू शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 2:18 PM IST








