Car Insurance : फटाक्यांमुळे गाडीला आग लागली तर Insurance मिळणार का?

Last Updated:

फटाके रस्त्यावर फोडल्यामुळे अनेकवेळा गाड्यांचं नुकसान होतं. काही फटाके चुकून गाडीखाली गेल्यामुळे गाडीला आग लागल्याच्या देखील घटना घडल्याचं तुम्ही ऐकलं असेल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : दिवाळीला सुरुवात झाली आहे. यामुळे आता प्रत्येक घराबाहेर रोषणाई दिसू लागली आहे. शिवाय लोक आता फटाके फोडू लागले आहेत. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फटाके उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलं ते रस्त्यावर येऊन फोडतात. तसे पाहाता फटाक्यांमुळे प्रदुषण होते, ज्यामुळे ते न फोडलेलेच बरे. पण आता काही प्रदूषण किंवा धूर रहित फटाके बाजारात आले असल्याचं सांगितलं जात आहे.
फटाके रस्त्यावर फोडल्यामुळे अनेकवेळा गाड्यांचं नुकसान होतं. काही फटाके चुकून गाडीखाली गेल्यामुळे गाडीला आग लागल्याच्या देखील घटना घडल्याचं तुम्ही ऐकलं असेल. अशावेळी प्रत्येक गाडीच्या मालकाच्या मनात धाकधूक होत असते आणि प्रश्न निर्माण होतो की जर फटाक्यांमुळे माझ्या गाडीला आग लागली तर ते गाडीच्या इंशोरन्समध्ये क्लिअर होईल का?
सामान्यतः, कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आग लागणे एक कव्हर केलेले घटक आहे, जर तुमच्या पॉलिसीमध्ये आग लागण्याचा पॉइंट कव्हर केलेला असेल तर तुम्हाला तो मिळेल. पण कंपनी काही ठराविक आगीसाठी इन्शुरन्स देते. नैसर्गिक आगीसाठी इन्शुरन्स कव्हर होतो, तेच शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास काही कंपन्या इन्शुरन्स देत नाहीत.
advertisement
या सगळ्यात फटाक्यांमुळे लागलेली आग हा एक विशेष मुद्दा आहे. अनेक इन्शुरन्स कंपन्या याबाबतची त्यांच्या पॉलिसीच्या अटींच्या आधारे निर्णय घेतात. जर फटाक्यांमुळे आग लागल्यास, तर ग्राहकांना इन्शुरन्स कंपनीला नुकसानाची माहिती त्वरित द्यावी लागेल.
यामध्ये संबंधित पॉलिसीच्या अटी आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषतः, ग्राहकाने ह्या आग लागण्यास जबाबदार असलेल्या घटकांची माहिती द्यावी लागेल.
advertisement
याशिवाय, इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेत मदत करण्यासाठी ग्राहकांनी फटाक्यांमुळे लागलेली आग कशी झाली याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे. ह्यामध्ये त्यांना एक साक्षीदार किंवा पोलिसांची FIR आवश्यक असू शकते. अशा परिस्थितीत, इन्शुरन्स कंपनीच्या क्लेम प्रक्रियेला विलंब होऊ शकतो.
महत्वाचा मुद्दा असा की आग लागली तर तुम्ही ज्या कंपनीचा इन्शुरन्स घेतला आहे, त्याला फोन करा किंवा ज्या एजन्टकडून घेतलं आहे त्याला त्वरीत कळवा. कारण घटना घडल्याच्या 12 ते 24 तासांच्या आता तुम्हाला याबद्दल कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स मिळणार की नाही हे कळेल.
मराठी बातम्या/मनी/
Car Insurance : फटाक्यांमुळे गाडीला आग लागली तर Insurance मिळणार का?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement