advertisement

24 वर्षाच्या तरुणाची कमाल, 4 हजार पुस्तकांसह सुरू केला अनोखा बुक कॅफे, काय आहे खास?

Last Updated:

24 वर्षांच्या तरुणाने सुरू केलेले बुक कॅफे हे त्या सर्वांसाठी एक अनोखं आणि आकर्षक ठिकाण ठरत आहे.

+
News18

News18

मुंबई : मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात पुस्तकांच्या सान्निध्यात शांत बसायला जागा शोधणं आजही अनेकांसाठी आव्हानच असतं. पण रुपारेल कॉलेजच्या शेजारी अवघ्या 24 वर्षांच्या नितीन राकेश नाई तरुणाने सुरू केलेले बुक कॅफे हे त्या सर्वांसाठी एक अनोखं आणि आकर्षक ठिकाण ठरत आहे. विशेष म्हणजे इथे 100–200 नव्हे तर तब्बल 4 हजारांहून अधिक पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या कॅफेची संकल्पना अगदी वेगळी आहे. इथे येणाऱ्यांनी केवळ खाण्यापिण्यासाठी बसायचं नाही तर पुस्तकांसोबत वेळ घालवायचा. शांतपणे वाचायला मिळावं आणि तरीही खर्च खिशाला परवडेल असाच असावा. त्यामुळेच येथील मेन्यू फक्त 59 रुपयांपासून सुरू होतो हे या कॅफेचं मोठं आकर्षण आहे.
advertisement
मेन्यूमध्ये तरुणाईला भुरळ घालणारे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. त्यात विविध प्रकारचे मॅगी, वेज–नॉनवेज पिझ्झा, विविध प्रकारचे बर्गर, टाकोज, मोमोस, गार्लिक ब्रेड, फ्रेंच फ्राईज यांचा समावेश आहे. फक्त खाण्यापुरतं नव्हे तर पेयांच्या मेन्यूतही मोठी विविधता पाहायला मिळते. आकर्षक कोल्ड कॉफी, ओरिओ मिल्कशेक, चॉकलेट फ्रीझ, फ्रूट मिल्कशेक्स, मॉकटेल्स असे एकापेक्षा एक पर्याय इथे विद्यार्थ्यांना आणि पुस्तकप्रेमींना मिळतात. या सर्व पदार्थांची खासियत म्हणजे सगळं फ्रेश बनवलं जातं. त्यामुळे चव, गुणवत्ता आणि किफायतशीर दर या तिन्हींचं सुंदर मिश्रण कॅफेमध्ये मिळतं.
advertisement
कॅफेची रचना देखील तरुणाच्या कल्पकतेची साक्ष देते. भिंतींवर पुस्तकांच्या रॅक्स, उबदार पिवळ्या प्रकाशात वाचनासाठी दिलेले कोपरे, आरामदायी बसण्याची व्यवस्था आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण कॉलेज विद्यार्थ्यांसाठी तसेच पुस्तक वाचन आवडणाऱ्यांसाठी एक परफेक्ट हँगआऊट स्पॉट बनले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
24 वर्षाच्या तरुणाची कमाल, 4 हजार पुस्तकांसह सुरू केला अनोखा बुक कॅफे, काय आहे खास?
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement