Panvel News : पनवेलकरांसाठी मोठी बातमी; या भागातून थेट नवी मुंबई विमानतळासाठी बससेवा; तिकीट दर काय?

Last Updated:

Karanjade Bus Service : करंजाडे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. एनएमएमटीची थेट एसी इलेक्ट्रिक बससेवा सुरू झाली असून खांदेश्वर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास आता स्वस्त, जलद आणि सोयीस्कर झाला आहे.

News18
News18
नवी मुंबई : करंजाडे उपनगरातील प्रवाशांसाठी नव्या वर्षाची सुरुवात दिलासादायक ठरली आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली थेट सार्वजनिक वाहतूक अखेर सुरू झाली असून यामुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची बससेवा आता थेट करंजाडे मार्गावरून धावू लागली आहे. त्यामुळे करंजाडे परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी एक नवा, सोपा आणि परवडणारा पर्याय उपलब्ध झाला आहे.
पनवेल ते नवी मुंबई विमानतळ प्रवास आता जलद आणि परवडणारा
25 डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यानंतर विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एनएमएमटीने खांदेश्वर रेल्वेस्थानक ते विमानतळाच्या पूर्वेकडील कार्गो टर्मिनलपर्यंत बससेवा सुरू केली. ही बस करंजाडे उपनगरालगतून जात असल्यामुळे खांदेश्वर रेल्वेस्थानक आणि करंजाडे वसाहत यांना जोडणारी ही पहिली अधिकृत बससेवा ठरली आहे.
advertisement
प्रवासांचे अंतर किती मिनिटांत पूर्ण होणार?
यापूर्वी या मार्गावर कोणतीही थेट बस नसल्याने प्रवाशांना रिक्षांचा वापर करावा लागत होता. त्यासाठी 150 ते 200 रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागत होते. मात्र आता नव्या ए-5 क्रमांकाच्या एसी आणि बॅटरीवर चालणाऱ्या बससेवेमुळे प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. खांदेश्वर ते विमानतळाचा साडेसात किलोमीटरचा प्रवास अवघ्या 18 मिनिटांत पूर्ण होत असून कोणतेही सिग्नल किंवा अडथळे नसल्याने प्रवास जलद आणि आरामदायी होत आहे.
advertisement
पहिल्या पाच दिवसांत या बससेवेचा लाभ एक हजारांहून अधिक प्रवाशांनी घेतला आहे. यामध्ये विमानतळ कर्मचारी तसेच करंजाडे परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. करंजाडे नोड, मोठा खांदेश्वर गाव आणि विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी उभारलेल्या आर पॉकेट वसाहतीलगतून ही बस धावत असल्याने अनेक भागांतील रहिवाशांना खांदेश्वर रेल्वेस्थानक गाठणे सोपे झाले आहे.
जाणून घ्या बस भाडे
सध्या सुरुवातीच्या टप्प्यात एनएमएमटीने तीन बस सुरू केल्या असून दिवसभरात 45 फेऱ्या घेतल्या जात आहेत. सकाळी साडेसहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. खांदेश्वर ते विमानतळ कार्गो प्रवेशद्वारापर्यंत तिकीट फक्त 15 रुपये असून खांदेश्वर ते करंजाडे नोडपर्यंत केवळ 10 रुपये भाडे आकारले जात आहे. या स्वस्त आणि सोयीस्कर बससेवेमुळे भविष्यात अधिकाधिक प्रवासी या सेवेचा वापर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel News : पनवेलकरांसाठी मोठी बातमी; या भागातून थेट नवी मुंबई विमानतळासाठी बससेवा; तिकीट दर काय?
Next Article
advertisement
KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement