MLC Election Update: बारामतीची कसर दादांनी विधानपरिषदेत भरून काढली; काकांना धोबीपछाड

Last Updated:

बारामतीची कसर दादांनी विधानपरिषदेत भरून काढली; काकांना धोबीपछाड दिला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार मतांचा कोटा पूर्ण नसताना देखील विजयी ठरले आहेत.

News18
News18
मुंबई: विधानपरिषदेच्या निवडणूकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं. दादांनी मतांची कमतरता असताना देखील दुसरा उमेदवार दिला, आणि त्यांचे दोन्ही उमेदवार विजयी ठरले आहेत. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांचा अनुक्रमे 23 आणि 24 मते मिळवत विजय झाला आहे. खरंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 42 मते होती, त्यांनी जवळपास 4 मतांची गरज होती. ही मते दादांनी काँग्रेसची मतं फोडत मिळवली असल्याचं बोललं जात आहे.
काकांना धोबीपछाड: तर तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार शेकापच्या जयंत पाटलांनी अवघी बारा मत मिळाली आहेत, खरंतर लोकसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर हा विजय अजित पवारांसाठी महत्वाचा होता. त्यामुळे कुठेतरी अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना यामुळे बुस्टर डोस मिळाला, असं म्हणावं लागेल.
advertisement
विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया: "महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी  ठरले. या निवडणुकीकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष होतं. राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे आगामी काळात आमदारांनी दाखवलेल्या विश्वासाला हे माझे दोन्ही विजयी उमेदवार सार्थ ठरवतील, सर्व महायुतीला मतदान करणाऱ्या आमदारांचे आभार मानतो. बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीत एक अधिकचा उमेदवार आल्याने निवडणुकीत ट्वीस्ट आला होता. " अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी दिली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
MLC Election Update: बारामतीची कसर दादांनी विधानपरिषदेत भरून काढली; काकांना धोबीपछाड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement