अजितदादांनी कसली कंबर, 48 तासांमध्ये करणार मोठी खेळी, फटका कुणाला?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
करमाळ्याचे संजयमामा शिंदे आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भोयर हे 2 अपक्ष आमदार ऑलरेडी अजितदादांसोबत असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून मिळाली आहे.
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे : अजितदादांना त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज आहे. करमाळ्याचे संजयमामा शिंदे आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भोयर हे 2 अपक्ष आमदार ऑलरेडी अजितदादांसोबत असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून मिळाली आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे एकूण 41 आमदार + 2 अपक्ष, 23+23 असा एकूण 46 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला 2 अपक्ष वगळता आणखी 3 मतांची गरज आहे. ही जास्तीची तीन मतं अजितदादा फोडू शकतात का याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
न्यूज 18 मराठीला दिलेल्या विश्वसनिय सूत्रांच्या माहितीनुसार, त्यापैकी एका मुंबई स्थित आमदाराचे वडील आणि माजी मंञी हे ऑलरेडी राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले आहेत. त्यामुळे टेक्निकली काँग्रेसमध्ये असलेले हे युवा आमदार राष्ट्रवादीला मतदान करू शकतात का ते पाहावं लागणार आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातून नरहरी झिरवळ यांचे एक आमदार मिञ आणि काँग्रेसची महिला आमदार असे 2 काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. 11 जागांसाठी एकूण 12 अर्ज आल्याने आणि कुणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक होणार हे निश्चित झालं. राज्यातील राजकीय समीकरणं लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे. राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री द ललितमध्ये राहिले आहेत.
विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी ललितमध्ये बैठक होणार आहे. दरम्यान हसन मुश्रीफ आणि काही आमदार ललितमधून बाहेर पडलेत. रात्री अजित पवार गटाचे 27 आमदारच ललितमध्येच मुक्कामी होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2024 12:16 PM IST


