Amit Thackeray : 'फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड...', नगरसेवक बेपत्ता अन् अमित ठाकरेंची पोस्ट व्हायरल! व्यंगचित्र शेअर करत म्हणाले...

Last Updated:

Amit Thackeray FB Post : नगरसेवक पळवापळवीच्या प्रकरणावर अमित ठाकरेंनी पोस्ट करत टीका केली आहे. यावेळी त्यांनी एक व्यंगचित्र देखील शेअर केलं.

Amit Thackeray FB Post over Corporators missing
Amit Thackeray FB Post over Corporators missing
Amit Thackeray FB Post : अनेक महापालिकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे काही ठिकाणी ‘घोडेबाजार’ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे चार नवनिर्वाचित नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे शिंदेंचे नगरसेवक ताज हॉटेलमध्ये असून त्यांचा मुक्काम आणखी आठ दिवस तिथंच राहण्याची शक्यता आहे. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर अमित ठाकरेंनी पोस्ट करत टीका केली आहे. यावेळी त्यांनी एक व्यंगचित्र देखील शेअर केलं.

काय म्हणाले अमित ठाकरे?

नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत, असं म्हणत अमित ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांना टोला लगावला आहे.
advertisement

स्वार्थी राजकारण? अपमान नाही का होतं?

याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण? असा सवाल देखील अमित ठाकरे यांनी उपस्थित केला.

स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हा तमाशा

advertisement
या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा, असंही अमित ठाकरे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Amit Thackeray : 'फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड...', नगरसेवक बेपत्ता अन् अमित ठाकरेंची पोस्ट व्हायरल! व्यंगचित्र शेअर करत म्हणाले...
Next Article
advertisement
Shiv Sena UBT: विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटात भूकंप! ४ नगरसेवक 'नॉट रिचेबल', मातोश्रीचे टेन्शन वाढले
विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटात भूकंप! ४ नगरसेवक 'नॉट रिचेबल'; मातोश्रीच
  • सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच ठाकरे गटाचे चार नवनिर्वाचित नगरसेवक 'नॉट र

  • गटनेता निवडीच्या बैठकीपूर्वीच हे नाट्य घडले

  • पक्षाने या नगरसेवकांच्या दरवाजावर 'व्हिप'ची नोटीस चिकटवली आहे.

View All
advertisement