Weight Loss : जिमला न जाता, सहज वजन कसं कमी करायचं? विराट कोहलीच्या न्यूट्रिशनिस्टने दिल्या वेट लॉस टिप्स
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Virat kolhi nutritionist ryan fernando weight loss : ज्यांचे वजन वाढू लागते, ते लोक वजन कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करतात. काही लोक गोड खाणे सोडून देतात, तर काही फक्त सॅलडवरच राहतात. तर जे कधीच जिममध्ये जात नव्हते, ते जिमला जाऊन वर्कआउट सुरू करतात. मात्र, काही लोकांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो, तर काहींना अजिबातच फायदा होत नाही. तुमचंही वजन वाढत आहे, पण हे वाढतं वजन कसं कंट्रोल करायचं हे समजत नसेल, तर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे न्यूट्रिशनिस्ट रायन फर्नांडो यांनी सांगितलेला वजन कमी करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या. रायन यांनी अलीकडेच ‘समथिंग बिगर’ पॉडकास्टमध्ये घरबसल्या वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय शेअर केला आहे. जाणून घ्या, रायन फर्नांडो यांचा वजन कमी करण्याचा बेस्ट उपाय.
इंडियनएक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, रायन फर्नांडो सांगतात की तुम्ही संपूर्ण महिनाभर काय खात-पित आहात याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पोषणतज्ज्ञाची किंवा डॉक्टरची गरज नाही, तर पोर्शनवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये फक्त 200 ग्रॅमच अन्न घ्या. वजन कमी करण्यासाठी पोर्शन कंट्रोल खूप आवश्यक आहे. त्यांच्या मते, तुमचे डाएट आणि स्मार्ट ईटिंग हॅबिट्स वजन कमी करण्यात मोठी भूमिका बजावतात. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कोणतीही गोष्ट पूर्णपणे अन्न सोडणे गरजेचे नाही. भात खाऊ नये असे नाही. अन्न सोडणे किंवा खाणे यामुळे वजनावर परिणाम होत नाही, तर तुम्ही कोणतेही अन्न किती प्रमाणात खाता, यावरच फरक पडतो. याशिवाय या गोष्टींकडेही लक्ष द्या.
advertisement
advertisement
रायन फर्नांडो यांच्या मते, कोणालाही संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कार्बोहायड्रेटयुक्त अन्न, भात वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये. तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर जुन्या काळातील लोकांच्या खाण्याच्या सवयी अंगीकाराव्या लागतील. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर जेवण करू नये, पण आजच्या काळात ते शक्य नसते. तरीही, तुम्ही आहारात काय घेत आहात आणि पोर्शन किती आहे, याकडे नक्की लक्ष द्या.
advertisement
advertisement
डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करा. रात्रीच्या जेवणात हिरव्या भाज्या आणि थोडेसे प्रोटीन घ्या. लो किंवा झिरो कॅलरी डाएट ड्रिंक्स पिणे टाळा. हे आर्टिफिशियल स्वीटनर्स पोटाच्या आरोग्यास नुकसान पोहोचवू शकतात. ते वजन कमी करत नाहीत, उलट वाढवतात. प्रोटीन मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे क्रेव्हिंग कमी होते आणि अनहेल्दी स्नॅक्स खाण्याची सवय सुटू शकते. कार्ब्स आणि फॅटच्या जागी प्रोटीन घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
advertisement
वजन वाढत आहे आणि ते वाढणे थांबावे असे वाटत असेल, तर देशातील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट रायन फर्नांडो यांच्या या वेट लॉस टिप्स फॉलो करायला सुरुवात करा. रायन बॉलिवूडमधील अनेक कलाकार जसे शाहिद कपूर, आमिर खान तसेच विराट कोहली, सायना नेहवाल यांसारख्या खेळाडूंना न्यूट्रिशनविषयक सल्ला देत असतात.








