लाडकी बहिण योजनेबाबत 'मुंबै' बँकेचा मोठा निर्णय; अडीच लाख महिलांना मिळणार लाभ...
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
आता या लाडक्या बहिणींच्या मदतीला मुंबै बँक सरसावली आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण या योजनेत, मुंबै बँकेनं महत्वाचा निर्णय घेतला. राज्यातील तब्बल अडीच लाख महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुंबई: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यातील महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. केंद्राच्या धरतीवर राज्य सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात सुरूवातीच्या काळात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती होत्या, त्या अटी आणि शर्ती नंतरच्या काळात राज्य सरकारने शिथील केल्या. आता याबाबत अर्ज करण्याची प्रक्रिया देखील ऑनलाईन करण्यात आली आहे.
'मुंबै' बँकेचा मोठा निर्णय; आता या लाडक्या बहिणींच्या मदतीला मुंबै बँक सरसावली आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण या योजनेत, मुंबै बँकेनं महत्वाचा निर्णय घेतला. राज्यातील तब्बल अडीच लाख महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा शुभारंभ राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यांच्या हस्ते झाला. राज्य सरकारच्या महीला आणि बालकल्याण विभागानं सांगितलेल्या आकडेवारीतील गोरगरीब महिलांना बँक खाते उघडण्यासाठी लागणारी मिनिमम रक्कम मुंबै बँकेनं शुन्य रूपये केली आहे. या निर्णयामुळे महिलांना त्यांचे बँक खाते शुन्य रूपयांत अत्यंत सुलभतेने उघडता येणार आहे.
advertisement
बँकेने शुन्य रक्कम बॅलन्स खाते ही योजना या लाभार्थी महिलांसाठी सुरू केली आहे. सर्वसाधारणपणे 1 लाख खाती उघडली, तरी 10 कोटींचे उत्पन्न बँकेला मिळाले असते. परंतु नफ्याचा विचार न करता हा निर्णय लोककल्याणासाठी घेतला असल्याचं मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
या योजनेबाबत बोलताना प्रविण दरेकर म्हणतात की, "मुंबै बँकेने उचललेलं हे पाऊल अत्यंत महत्वाचं आहे. यामुळे आर्थिक दृष्ट्या अत्यंत कमकुवत कुटुंबातील महिलांना यामुळे मोठा आधार मिळेल. कोट्यवधींचा नफा विचारात न घेता हा हे पाऊल लोककल्याणासाठी, माता- भगिनींच्या कल्याणासाठी उचललं"
advertisement
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे देखील या योजनेच्या शुभारंभावेळी मुंबई बँकेच्या कार्यालयात उपस्थित होत्या. मुंबै बँकेने राबवलेल्या या उपक्रमामुळे निश्चितच कमकुवत आर्थिक स्थिती असणाऱ्या महिलांना बँकेत शुन्य रूपयांत खाते उघडता येणार आहे. झिरो बॅलन्स खाते असल्याने योजनेच्या लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही. तब्बल अडीच लाख महिलांना मुंबै बँकेच्या या योजनेचा फायदा होईल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जर मुंबै बँकेची शाखा असेल तरी निश्चितपणे तुम्हे या योजनेचा लाभ घेऊ शकता. मुंबै बँकेने राबवलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरांतून कौतुक होतं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 09, 2024 6:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
लाडकी बहिण योजनेबाबत 'मुंबै' बँकेचा मोठा निर्णय; अडीच लाख महिलांना मिळणार लाभ...


