Mumbai Local: एल्फिन्स्टन पूल हटवणार, पण ‘त्या’ वायरने वाढवलं टेन्शन, मध्य रेल्वे मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Last Updated:

Central Railway: मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजचे पाडकाम अर्धवट राहिले असून कामात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे.

एल्फिन्स्टन पूल हटवणार, पण ‘त्या’ वायरने वाढवलं टेन्शन, मध्य रेल्वे मोठ्या निर्णयाच्या तयारीत
एल्फिन्स्टन पूल हटवणार, पण ‘त्या’ वायरने वाढवलं टेन्शन, मध्य रेल्वे मोठ्या निर्णयाच्या तयारीत
मुंबई: मध्य रेल्वे परळ–प्रभादेवीदरम्यान अर्धवट पाडण्यात आलेल्या एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिजचे उर्वरित काम पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत 20 ते 23 तासांचा मोठा ब्लॉक घेण्याची शक्यता आहे. पुलाखाली असलेल्या ओव्हरहेड वायरमुळे पाडकामात सर्वात जास्त अडचणी येत असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाला विशेष उपाययोजना कराव्या लागत आहेत.
सोमवारी (ता. 24) मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी परळ स्थानक परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. पाडकामाच्या दरम्यान कोणती पावले उचलायची? कोणते विभाग आधी हटवायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकल व मेल–एक्स्प्रेस गाड्यांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये यावर सविस्तर चर्चा झाली.
advertisement
रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या गाड्यांना 25 हजार व्होल्टचा पुरवठा ओव्हरहेड वायरमधून मिळतो. यातील एक महत्त्वाचा भाग पुलाच्या खालच्या स्टील फ्रेमला जोडलेला असल्याने ती वायर सरळ बाजूला हलवणे शक्य नाही. परिणामी संपूर्ण वायर, ब्रॅकेट इन्सुलेटर आणि त्यासंबंधित सर्व उपकरणे पूर्णपणे काढावी लागणार आहेत. हे काम तांत्रिकदृष्ट्या नाजूक असून ते पूर्ण करण्यात किमान तीन ते चार तास जातील असे अभियंत्यांचे मत आहे.
advertisement
विशेष पथक तयार
परळ स्थानकात एकूण पाच मार्गिका आहेत. प्रत्येक मार्गिकेवर पुलाच्या पायथ्याशी एक किंवा दोन इन्सुलेटर वेल्डेड अवस्थेत असल्याने वायर काढताना अधिक दक्षता घेणे अनिवार्य आहे. थोडीशी चूक झाली तर वीजपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी विशेष निगराणी पथक तयार करण्यात आले आहे.
तारखेची लवकरच घोषणा
एल्फिन्स्टन पुलाची एकूण लांबी 132 मीटर असून त्यापैकी 61 मीटरचा भाग मध्य रेल्वेच्या हद्दीत येतो. या भागातील संरचना सुरक्षित हटविण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुरक्षा निकषांची पूर्तता करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ब्लॉकच्या तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
advertisement
स्वतंत्र कार्ययोजना
रेल्वेच्या म्हणण्यानुसार ओव्हरहेड केबल्स दोन ते चार किलोमीटर लांब असतात आणि त्या ओएचई मास्टशी जोडलेल्या असतात. त्यामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी या मास्टचे तसेच त्यावरील उपकरणांचे स्थानांतरही करावे लागणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी स्वतंत्र कार्ययोजना तयार केली जात असून ती टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: एल्फिन्स्टन पूल हटवणार, पण ‘त्या’ वायरने वाढवलं टेन्शन, मध्य रेल्वे मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Next Article
advertisement
Raj Thackeray :  'पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण एमएमआर...”
'पोटातली मळमळ ओकतायत”,‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त,“ संपूर्ण MMR...
  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

View All
advertisement