Navi Mumbai :'लग्न पक्कं आहे' म्हणत जिंकला विश्वास; 2 वर्षानंतर बाहेर आलं धक्कादायक कांड
Last Updated:
Navi Mumbai : नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्यात लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेची फसवणूक आणि शारीरिक शोषण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्यात 41 वर्षीय महिलेची फसवणूक आणि शारीरिक शोषण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मंगेश विश्वनाथ नेने (वय 53) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या काही महिन्यापासून महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे.
विश्वास, प्रेम आणि अखेर फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल 2023 पासून 27 जानेवारी 2025 या कालावधीत आरोपीने पीडित महिलेशी सातत्याने संपर्क ठेवला. तिच्या विश्वासावर बसत आरोपी तिच्या राहत्या घरी तसेच नवी मुंबईतील विविध ठिकाणी तिच्याशी शरीरसंबंध ठेवत होता. या दरम्यान आरोपीने अनेक वेळा लग्न करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र नंतर आरोपीचे हे आश्वासन खोटे असल्याचे समोर आले. लग्न करण्याचा कोणताही हेतू नसताना आरोपीने महिलेला भावनिकरित्या गुंतवून तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिलेला मानसिक, भावनिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला असे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
advertisement
या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह चव्हाण अधिक तपास करत आहेत. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 1:59 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai :'लग्न पक्कं आहे' म्हणत जिंकला विश्वास; 2 वर्षानंतर बाहेर आलं धक्कादायक कांड









