Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबद्दल हॉस्पिटलमधून आली अपडेट, पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया

Last Updated:

या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला  छगन भुजबळ यांना दिला आहे.

chhagan bhujbal
chhagan bhujbal
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची 28 ऑक्टोबर रोजी अचानक प्रकृती खालावली होती. त्याामुळे त्यांना तातडीने मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भुजबळा यांच्या छातीत दुखत होतं आणि अस्वस्थता या तक्रारींमुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
आज सोमवारी छगन भुजबळ यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई इथं हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. विख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
advertisement
या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला  छगन भुजबळ यांना दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होतील, अशी माहिती छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबद्दल हॉस्पिटलमधून आली अपडेट, पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement