Dharmveer 2:'...दिघे साहेब तेव्हा म्हणाले होते, एकनाथ हा राज्याचा मुख्यमंत्री होईल' CM शिंदे झाले भावुक
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
धर्मवीर 2 हा चित्रपट 9 ऑगस्टला रिलीज होत आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भावनिक भाषण केलं...
मुंबई:
धर्मवीर 2 zहा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र भरात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज लाँट करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, अभिनेता प्रसाद ओक, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थितांना संबोधित करताना भावनिक भाषण केलं.
advertisement
काय म्हणाले मुख्यमंत्री: "उद्या गुरुपौर्णिमा आहे, पण आजच वाटते आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे काम लोकांसमोर आणण्यासाठी धर्मवीर सिनेमा काढला, तो ब्लाॉकबस्टर ठरला. आता दुसरा भाग येत आहे. बाळासाहेब, दिघे साहेबांनी आम्हाला विचार दिले, मला आनंद दिघे साहेब म्हणाले होते. एकनाथ तुला महाराष्ट्रासाठी जगायचे आहे, त्यांची दूरदृष्टी असेल. ताईला दिघे साहेबांनी सांगितले होते हा माझा एकनाथ मुख्यमंत्री होईल, 20 वर्षांपूर्वी जे साहेब बोलले ते खरं ठरलं!"
advertisement
देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी:
धर्मवीर - 2 हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या सिनेमाबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मनात देखील एखादा सिनेमा काढण्याची सुप्त इच्छा देखील बोलून दाखवली आहे, नेमकं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं,
"धर्मवीर आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारखा नेता आणि हजारो अनुयायी घडवले. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, ही टॅगलाईन या सिनेमापूर्ती मर्यादित नाही तर एकनाथजी शिंदे आणि आमच्या जीवनाशी निगडित टॅग लाईन आहे. दिघे साहेबांच्या शिकवणी प्रमाणे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद देत असतील."
advertisement
डायलॉग्समधून ठाकरेंवर निशाणा:
view commentsधर्मवीर सिनेमातील डायलॉग्समधून अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी आघाडी करून साहेबांच्या हिंदूत्वाला धक्का पोहोचवला असं या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 20, 2024 9:33 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Dharmveer 2:'...दिघे साहेब तेव्हा म्हणाले होते, एकनाथ हा राज्याचा मुख्यमंत्री होईल' CM शिंदे झाले भावुक


