Diwali Market: दिवाळीत दादर मार्केटमध्ये फुलांना सोन्याचं मोलं, शेवंती, झेंडू खायोत भाव, गुलाबाचा दर काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Dadar Flower Market: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दादर फूल मार्केटमध्ये फुलांच्या दरात मोठी वाढ झालीये. झेंडू, गुलाब आणि इतर फुलांचे दर जाणून घेऊ.
मुंबई: दिवाळी अगदी दारात आली आहे. यंदा दिवाळी सोमवारी, 20 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे सध्या मुंबईत खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. घराघरात दिव्यांची रोषणाई, सजावट आणि देवपूजेची तयारी सुरू झाली आहे. आणि या सगळ्यात फुलांचं महत्त्व सर्वात जास्त असतं. म्हणूनच सध्या मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, या गर्दीसोबतच फुलांचे दरही चांगलेच वाढले आहेत.
फुलांचे वाढते दर
या वर्षी झेंडू, शेवंती आणि गुलाब या फुलांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कालपर्यंत 60 रुपयांना मिळणारा झेंडू आता 100 रुपये किलो दराने विकला जात आहे. तर शेवंती फुलांचा दर तब्बल 80 रुपये पाव किलो इतका झाला आहे. याशिवाय गुलाब पाकळ्यादेखील 100 रुपये पाव किलो दराने उपलब्ध आहेत.
advertisement
हार, गजरे आणि तोरणांचे दर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हार आणि गजऱ्यांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. झेंडूचे मध्यम हार 150 रुपये, तर मोठे हार 200 रुपये दराने विकले जात आहेत. साधे हार सुमारे 120 रुपये, आणि गजरा एका हाताला 100 रुपये दराने मिळतोय. घर सजावटीसाठी लागणारे मोठे तोरण 70 रुपये मीटर, तर कोंबरा फुलं 10 रुपयांना विकली जात आहेत.
advertisement
पूजेसाठी लागणारे साहित्य
दिवाळीच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दरही निश्चित झाले आहेत. कमळ फुलं 50 रुपयांना 3 आणि 60 रुपयांना 12 अशा दराने मिळतात. कडू कारळ, जे नरक चतुर्थीला फोडण्यासाठी वापरले जाते, ते 20 रुपयांना 4 मिळतात. भाताच्या लोंब्या 20 रुपयांना एक आणि 50 रुपयांना तीन या दरात उपलब्ध आहेत. तसेच झाडू 10 आणि 20 रुपयांना मिळत असून त्यांचीही मागणी वाढली आहे.
advertisement
ग्राहकांची मोठी गर्दी
view commentsफुल मार्केटमध्ये दर वाढले असले तरीही ग्राहकांचा उत्साह मात्र ओसरण्याचं नाव घेत नाही. लोक आपल्या देवपूजेची आणि घर सजावटीची तयारी करत आहेत. संपूर्ण दादर परिसर फुलांच्या सुगंधाने आणि रंगीबेरंगी वातावरणाने नटला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 3:12 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Diwali Market: दिवाळीत दादर मार्केटमध्ये फुलांना सोन्याचं मोलं, शेवंती, झेंडू खायोत भाव, गुलाबाचा दर काय?