Mumbai News: कॅज्युअलपासून ट्रेंडीपर्यंत... महिलांनो दादरमध्ये 'या' दुकानात 100 रूपयांत करा शॉपिंग

Last Updated:

दादर परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलांसाठी एक आकर्षण ठरलेला टी-शर्ट स्टॉल सध्या विशेष चर्चेत आहे. वाढत्या महागाईच्या काळात इतक्या कमी किमतीत फॅशनेबल कपडे मिळत असल्याने तरुणी आणि महिलांची येथे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

+
दादरमध्ये

दादरमध्ये महिलांसाठी शॉपिंगची पर्वणी: प्रिंटेड टी-शर्ट फक्त १०० रुपयांत!

मुंबई: दादर परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलांसाठी एक आकर्षण ठरलेला टी-शर्ट, स्टॉल सध्या विशेष चर्चेत आहे. दादर वेस्ट येथील सुविधा शॉपच्या बाजूला आणि डोमिनोजच्या खाली असलेल्या या स्टॉलवर महिलांसाठी लागणारे आकर्षक प्रिंटेड टी-शर्ट अवघ्या 100 रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वाढत्या महागाईच्या काळात इतक्या कमी किमतीत फॅशनेबल कपडे मिळत असल्याने तरुणी आणि महिलांची येथे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
या स्टॉलवर विविध प्रकारचे डिझाईन्स, आकर्षक प्रिंट्स, रंगसंगती आणि असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत. कॅज्युअल वेअरपासून ते ट्रेंडी आणि कॉलेज वियरसाठी योग्य असणारे टी-शर्ट येथे सहज मिळतात. सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असलेले स्लोगन प्रिंट्स, कार्टून प्रिंट्स, फ्लोरल डिझाईन्स आणि मॉडर्न पॅटर्न्स यांचा समावेश या संग्रहात आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींपासून ते नोकरी करणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांनाच येथे आवडीनुसार टी-शर्ट निवडता येत आहेत.
advertisement
या स्टॉलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे देण्यात येणारी आकर्षक ऑफर. ग्राहकांनी 5 टी-शर्ट खरेदी केल्यास 1 टी-शर्ट मोफत देण्यात येत आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना कमी किमतीत जास्त खरेदी करण्याची संधी मिळत असून अनेकजण मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासाठी एकत्र खरेदी करताना दिसत आहेत. सणासुदीच्या काळात किंवा कॉलेजसाठी कपड्यांची खरेदी करताना ही ऑफर विशेष फायदेशीर ठरत आहे.
advertisement
याशिवाय हा स्टॉल होलसेल दरातही टी-शर्टची विक्री करत आहे. त्यामुळे छोटे व्यावसायिक, बुटीक मालक आणि पुनर्विक्रेते यांच्यासाठीही ही एक उत्तम संधी ठरत आहे. कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवण्यासाठी अनेकजण येथे होलसेल खरेदी करत आहेत. स्थानिक बाजारपेठेत अशा प्रकारचे स्वस्त आणि दर्जेदार कपडे उपलब्ध करून देणारा हा स्टॉल सध्या दादरमधील खरेदीदारांमध्ये लोकप्रिय ठरत असून महिलांसाठी हा एक आवर्जून भेट देण्यासारखा ठिकाण बनला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: कॅज्युअलपासून ट्रेंडीपर्यंत... महिलांनो दादरमध्ये 'या' दुकानात 100 रूपयांत करा शॉपिंग
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement