Dahihandi 2024 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट! थरावरुन कोसळून 41 गोविंदा जखमी

Last Updated:

Dahihandi 2024 : मुंबईत जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना काही गोविंदा जखमी झाले आहेत.

मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट!
मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट!
मुंबई : मुंबईसह राज्यभर दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात लाखो रुपयांचे बक्षिसे असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे. मानवी मनोरे रचताना पाहणाऱ्यांचेही श्वास थांबत आहेत. मुंबईत जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 41 गोविंदा जखमी झाले असून 8 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा - Pune : दहीहंडीच्या दिवशी मोठी राजकीय बातमी, भाजपच्या पाटलांना भेटले शरद पवार
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दुपारी 4 वाजेपर्यंत विविध पथकातील 41 गोविंदा जखमी झाले आहे. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 4, सायन रुग्णालयात 2, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 1, पोद्दारमध्ये 4, राजावाडीमध्ये 1, एमटी अगरवार रुग्णालयात 1 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. या सर्व जखमी गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Dahihandi 2024 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट! थरावरुन कोसळून 41 गोविंदा जखमी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement