बालपणी लिहिलेला निंबध गाजला, आता साहित्यिक पदापर्यंत झाला प्रवास, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व महेश काणेकरांसोबत विशेष संवाद, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग - काही व्यक्तींमध्ये अनेक कलागुण असतात आणि त्या कलागुणांच्या जोरावर ते समाजामध्ये आपली एक वेगळी आणि विशेष ओळख तयार करत असतात. आज अशाच एका व्यक्तिमत्त्वाबाबत आपण जाणून घेणार आहोत. चित्रकार, लेखक, गायक, साहित्यिक, परीक्षक असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले कणकवली येथील मूळ रहिवाशी महेश काणेकर यांच्या चौफेर प्रगतीचा लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
advertisement
महेश काणेकर हे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात कार्यरत असले तरीही त्यांनी आपले छंद अगदी तन्मयतेने जोपासले. महेश काणेकर ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांचा जन्म मूळ सिंधुदुर्ग येथील आहे. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासूनच त्यांना मूर्तीकलेची आवड होती. त्यांच्या घरात मूर्तीकला ही त्यांच्या आजोबांना अवगत होती.
advertisement
शाळेत शिकत असल्यापासूनच वाचनाची आवड असल्याने ते वाचन करायचे. नववीमध्ये शाळेत निबंध स्पर्धा होती. त्यावेळी त्यांनी पहिला निबंध लिहिला आणि तो शाळेत खुप गाजला. तेव्हापासून त्यांनी लिखाणास सुरुवात केली. नंतरच्या कालावधीत कवी ते गायक असा त्यांचा प्रवास सुरू झाला. बरीच भक्ती गीते त्यांनी गायली. अशाप्रकारे ते एक साहित्यिक बनले. तसेच अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.
advertisement
प्रकाशित साहित्य -
त्यांचा निर्मोही लघुकथासंग्रह, एका रम्य गावात हा ललित लेखसंग्रह, करामत बाल मूर्तिकाराची, आम्रवृक्ष माझा बाल मित्र हा कथासंग्रह, एक रविवार हौसेचा संस्कारक्षम कथासंग्रह, चिमण्यांची शाळा बाल कवितासंग्रह, स्वप्नाळू लाल्या प्रेरक बाल कथासंग्रह आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. त्याशिवाय प्रामाणिक कमलाची गोष्ट प्रेरक कथासंग्रह, दोन मनांची गोष्ट (प्रेम या पवित्र नात्याचे भावनिक स्नेहचित्रण) व सुजाता (स्त्री जीवनाच्या चढउताराच्या दाहक आलेखाचा व्यापक वेध घेणारी कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे.
advertisement
अभिनंदनीय यश -
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जीवनातील अविस्मरणीय प्रसंग या लेखास साप्ताहिक विवेक आयोजित महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या शिवाय हुंडाविरोधी भित्तीपत्रक स्पर्धेत राज्यातून द्वितीय पुरस्कार, ढिश्यांव ढिश्यांव या दिवाळी अंकातील व्यंगचित्रास राज्यस्तरीय रौप्य पुरस्कार, अक्षरसिंधू या साहित्यिक चळवळीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरीव सांस्कृतिक व साहित्यिक कार्य केल्याबद्दल लळीत रंगभूमी पुणे, या संस्थेचा 1993 साली लळीत युवा पुरस्कार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग आयोजित पोस्टर, रांगोळी व चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक, जागृती कला मंडळ वेंगुर्ले आयोजित तंटामुक्ती बोधकथा लेखन स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक असे अभिनंदनीय यश त्यांना मिळालेले आहे.
advertisement
आकाशवाणीकडूनही दखल -
view commentsविशेष दखल घेण्यासारखी बाब म्हणजे त्यांच्या लघुकथा, बालकथा, वैचारिक लेख, कविता यांचे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर वाचन झालेले आहे. तसेच माझा गाव कणकवली या विषयावर त्यांची आकाशवाणीने मुलाखत घेतली आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
October 09, 2024 6:31 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
बालपणी लिहिलेला निंबध गाजला, आता साहित्यिक पदापर्यंत झाला प्रवास, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व महेश काणेकरांसोबत विशेष संवाद, VIDEO

