मुंबईची हवा कुठे सर्वाधिक प्रदूषित, BMC पालिकेचा ‘मानस’ तुम्हाला सगळं सांगेल!

Last Updated:

मुंबई शहरात कोणत्या भागात हवा सर्वाधिक दूषित आहे आणि कुठे प्रदूषणाचा धोका वाढत आहे. याची माहिती आता मुंबईकरांसमोर अधिकच स्पष्ट रित्या समोर येणार आहे.

महानगरातील वाढत्या प्रदूषणाला वैज्ञानिक कवच; ‘मानस’ प्लॅटफॉर्ममुळे मुंबईकरांना मिळणार परिसरनिहाय हवा गुणवत्तेची अचूक माहिती
महानगरातील वाढत्या प्रदूषणाला वैज्ञानिक कवच; ‘मानस’ प्लॅटफॉर्ममुळे मुंबईकरांना मिळणार परिसरनिहाय हवा गुणवत्तेची अचूक माहिती
मुंबई: मुंबई शहरात कोणत्या भागात हवा सर्वाधिक दूषित आहे आणि कुठे प्रदूषणाचा धोका वाढत आहे. याची माहिती आता मुंबईकरांसमोर अधिकच स्पष्ट रित्या समोर येणार आहे. आयआयटी कानपूर आणि मुंबई महापालिका एकत्र येऊन ‘मानस’ (Mumbai Air Network for Advance Sciences- MANAS) नावाचा स्वतंत्र एअर क्वालिटी प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. ‘मानस’ एअर क्वालिटी प्लॅटफॉर्मचा पुढच्या सहा ते सात महिन्यांत उपक्रम सुरू होण्याची शक्यता आहे.
नवीन प्लॅटफॉर्म सहा ते सात महिन्यांत कार्यान्वित होणार
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मानस’ प्लॅटफॉर्मची उभारणी वेगात सुरू असून पुढील सहा ते सात महिन्यांत तो प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्लॅटफॉर्म नागरिकांसाठी खुला करण्यात येईल आणि कोणत्याही भागातील हवा गुणवत्ता रिअल- टाइममध्ये तपासणे शक्य होईल. सध्याच्या 28 निरीक्षण केंद्रांवर मर्यादा सध्या शहरात CPCB सोबत जोडलेल्या 28 एअर क्वालिटी मॉनिटरिंग केंद्रांतून फक्त दोन किलोमीटर परिसराचा हवा असलेला डेटा मिळतो.
advertisement
नव्या उपक्रमाअंतर्गत शहरभर 75 अतिरिक्त सूक्ष्म सेन्सर्स बसविण्यात येणार आहेत. हे सेन्सॉर्स अधिक तपशीलवार, क्षेत्रनिहाय आणि तत्काळ प्रदूषणाची नोंद करतील, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या प्लॅटफॉर्मचे कार्य पूर्ण झाल्यानंतर तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरच परिसरातील रिअल-टाइम हवा गुणवत्ता पाहता येईल. यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील हवेची गुणवत्ता वेळोवेळी तपासता येईल.
advertisement
स्वच्छतेसाठी व्यापक मोहीम, 676 रस्त्यांची सखोल साफसफाई
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरात स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी मोठा उपक्रम राबवला. विभागातील 220 कनिष्ठ पर्यवेक्षकांना तीन प्रमुख रस्त्यांची जबाबदारी देत 'रस्ते स्वच्छता आणि धूळ नियंत्रण मोहीम' 28 ते 30 नोव्हेंबर 2025 या तीन दिवसांत पार पडली. या मोहिमेत 570 मेट्रिक टन कचरा, 25 मेट्रिक टन टाकाऊ साहित्य आणि 18 टन राडारोडा हटवण्यात आला. तसेच तब्बल 1,888 किलोमीटर लांबीचे 767 रस्ते स्वच्छ करण्यात आले. रस्ते धुण्यासाठी 163 पाण्याचे टँकर, तर धूळ नियंत्रणासाठी 119 मिस्टिंग उपकरणे वापरण्यात आली. या उपक्रमामुळे शहरातील रस्त्यांवरील धूळ कमी होऊन हवा गुणवत्तेतही सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईची हवा कुठे सर्वाधिक प्रदूषित, BMC पालिकेचा ‘मानस’ तुम्हाला सगळं सांगेल!
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement