Mumbai Metro : मुंबईकरांसाठी खुशखबर! आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार, वाचा कुठून कुठपर्यंत धावणार

Last Updated:

Metro 2 B : मुंबई मेट्रो-२बीचा मंडाले ते चेंबूर टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुले होणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त पाच स्थानके सुरू होतील. प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यास मदत होईल.

News18
News18
मुंबई : मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांतर्गत मेट्रो-२बी चा महत्त्वाचा टप्पा लवकरच प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. जो टप्पा मंडाले (मानखुर्द) ते चेंबूर असा असेल. एमएमआरडीएने या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी लागणारे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले दिले. मेट्रो-3 नंतर मंडाले-चेंबूर मार्ग चालू झाल्यामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठा सुधारणा होणार आहे.
जाणून घ्या सविस्तर प्रकल्पाबाबत...
मेट्रो-2 प्रकल्पाची एकूण लांबी 23.6 किमी आहे आणि हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. आतापर्यंत प्रवासी सेवेत दाखल असलेला मार्ग म्हणजे लाइन 2ए (दहिसर ते डीएन नगर) आणि लाइन 2बी (डीएन नगर ते मानखुर्द-मंडाले). आता ‘मेट्रो-2बी’ अंतर्गत मंडाले ते चेंबूर मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी एमएमआरडीएला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात 5.6 किमी लांबीचा मार्ग प्रवाशांसाठी खुले केला जाणार आहे.
advertisement
या दिवशी होणार शुभारंभ
या मार्गावरील स्थानकांची साफसफाई आणि रंगकामाचे काम सध्या जोरात सुरू आहे. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखजों यांनी नुकतेच स्थानकांची पाहणी करून कामाची स्थिती पाहिली आहे. अंदाज आहे की ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत मंडाले ते चेंबूर मेट्रो सेवा सुरू होऊ शकते.
पहिल्या टप्प्यात फक्त पाच स्थानके प्रवासी सेवेत दाखल होतील. ही स्थानके म्हणजे मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डायमंड. संपूर्ण 23.6 किमी मार्गाची कामे अजून पूर्ण झालेली नाहीत पण प्रवाशांसाठी सुरुवात होत असल्याने खूप उत्साह आहे.
advertisement
मेट्रो मार्गिकेचे काम सुरुवात झाली तेव्हा अंदाज होता की 2022 च्या ऑक्टोबरपर्यंत ही सेवा सुरू होईल. परंतु विविध अडथळ्यांमुळे काम वेळेत पूर्ण झाले नाही. कंत्राटदाराची अकार्यक्षमता, वीज ट्रान्समिशन लाईन्स हलवणे आणि इतर अडथळ्यांमुळे अनेकवेळा प्रकल्पाच्या मुदतीत उशीर झाला. तरीही आता सुरुवात होणार असल्याने पूर्व उपनगरातील नागरिकांना मोठा फायदा होईल.
मेट्रो-2बीच्या सुरू होण्यामुळे लोकांच्या दैनंदिन प्रवासाची सोय सुलभ होईल तसेच वाहतुकीत वेळेची बचत होईल आणि शहरातील ट्राफिकवरही काही प्रमाणात ताण कमी होईल. नागरिक या नवीन मेट्रो सेवेसाठी प्रचंड उत्सुक आहेत आणि या टप्प्याचे उघडणे मुंबईकरांसाठी चांगली बातमी ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मुंबईकरांसाठी खुशखबर! आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार, वाचा कुठून कुठपर्यंत धावणार
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement